Home चंद्रपूर लाइट गुल होणार,तुम्हाला एसएमएस येतो का ?

लाइट गुल होणार,तुम्हाला एसएमएस येतो का ?

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र वादळी वारा पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, हीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. सध्या महावितरणकडून पावसाळ्यापूर्वीची आवश्यक कामे केली जात आहेत. त्यामुळे वीज जाण्याचे प्रमाणही काहीसे वाढले आहे. परंतु, ज्या भागांमध्ये विजेचे काम सुरु आहे. त्या भागातील ग्राहकांना एसएमएस पाठवून वीजपुरवठा बंद राहणार असल्याची पूर्वसूचना दिली जाते. असा एसएमएस येत नसेल तर महावितरणकडे तक्रारही करता येते.

वादळ, वारा, पावसात वीज गुल

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः वीज गुल होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यातच जिल्ह्याला वादळी वायासह अवकाळी पावसाने काही दिवसांपूर्वी चांगलेच झोडपून काढले. यामुळे अनेक भागांतील विजेचे खांब कोसळल्याने काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होता. पावसाळ्यापूर्वीची कामे सध्या महावितरणने करायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये वीज वाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्यांची कटाई, रोहित्र दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती यासारख्या कामांना सुरुवात केली आहे.

पावसाळ्यापूर्वीची कामे आणखी एक कारण

सध्या पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या उद्भवू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी महावितरणची कामे सुरु आहेत. त्यामुळे ही कामे करताना वीजपुरवठा खंडित करावा लागतो. मात्र ज्या ग्राहकांचे मोबाइल क्रमांक नोंदणी झालेले आहेत. त्यांच्याकडे एसएमएसद्वारे वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत तसेच वीज केव्हा सुरु होणार आहे, याबाबत माहिती दिली जात असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तुम्हाला एसएमएस येतात का?

प्रभागातील वीजपुरवठा खंडित

झाला तर काही वेळा एमएमएस येतो. मात्र अनेकवेळा वीज पुरवठा खंडित केला जात असला तरी एसएमएस मात्र येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. विशेषतः दुरुस्तीची कामे करण्यापूर्वी ग्राहकांना १२ तासांपूर्वी कळविले पाहिजे.

खंडित होणार असल्याबाबत एसएमएस येतो. मात्र दिलेल्या वेळेमध्ये वीजपुरवठा पूर्ववत सुरू होत नसल्याचा प्रकार अनेक वेळा घडतो. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here