Home क्राईम स्टोरी घर बसल्या ऑनलाइन व्यवसायाचे आमिष दाखवून ४० हजारांनी गंडविले

घर बसल्या ऑनलाइन व्यवसायाचे आमिष दाखवून ४० हजारांनी गंडविले

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

ब्रह्मपुरी :-  मोबाइल पाहत असताना एखादा व्हिडीओ अपलोड होतो किंवा आपोआप सुरू होतो. त्यात घरी बसून व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन गंडा घालणाऱ्यांची टोळी सध्या सक्रिय असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. असाच एक प्रकार सहकार नगर येथे घडला. येथील रहिवासी संतोष देविदास देवागे यांना तब्बल ३१ हजार ५०० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली असून, लखनऊ येथील तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

येथील सहकार नगरमध्ये गडचिरोली येथे वनपाल पदावर कार्यरत संतोष देवागे परिवारासह राहतात. २ मे रोजी ते यूट्युबवर व्हिडीओ पाहत असताना एक व्हिडीओ सुरू झाला. एका कंपनीची विस्तृत माहिती देण्यात येऊन संपर्क न ८०९३७९८९१५ देण्यात आला होता. त्यांनी संपर्क केला असता, पेन्सिल / पेन डब्यात भरून ते परत कंपनीकडे द्यायचे. त्या मोबदल्यात चांगला

परतावा मिळेल, असे त्यांना मोबाइलवर सांगण्यात आले. कार्यालयाचे फोटो, पत्ता, मालकाचा आधार कार्ड, पॅन कार्ड आदी माहितीचे फोटो त्यांना पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवून सदर व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यानंतर क्युआर कोड पाठवून त्यावर अनेकदा पैसे पाठविण्यासाठी सांगण्यात आले. एकूण ३९ हजार ७५० रुपये पाठविल्यानंतर देखील आणखी ३१ हजार ५०० रुपये ठेवी म्हणून पाठविण्यास सांगण्यात आले. याबाबत पोलिसात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी रवींद्र सिंग, टिटू कुमार, पंकजसिंग भदोरिया (सर्व रा. लखन) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleउपक्रम :- मोवाडा गावात महिलांची उमेद अभियानांतर्गत मशाल फेरी.
Next articleलाइट गुल होणार,तुम्हाला एसएमएस येतो का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here