सामाजिक समावेशन मोहीम व शासकीय योजनांची जत्रा.
वरोरा (धनराज बाटबरवे):-
ग्रामीण जिवनात महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाने उमेद अंतर्गत विविध योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा उपक्रम राबवला आहे. त्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान वरोरा तालुक्यात राबवण्यात येत आहे. त्याचेच औचित्य साधून वरोरा तालुक्यातील टेमुर्डा आबामक्ता या जिल्हा परिषद सर्कल मधील मोवाडा या गावात महिलांनी काल दिनांक 8 मे ला मशाल फेरी काढून सर्वांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागात महिलांना स्वतःच्या पायावर आर्थिक द्रुष्टीने उभे करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत उमेद तर्फे अभियान राबविण्यात येत आहे त्यात महिलांनी सामील व्हावे व आत्मनिर्भर व्हावे हा संदेश देण्यासाठी काल मोवाडा गावांत महिलांनी मशाल फेरी काढली. यावेळी मोठ्या संखेने महिला सहभागी झाल्या होत्या.