Home चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांच्यासह अन्य अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले आनंदी जीवनाचे...

मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांच्यासह अन्य अधिकारी- कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले आनंदी जीवनाचे रहस्य

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असतो, तणावाचा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. ध्यान हा जुना सराव आहे. जो तणाव पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो. व्यस्त जीवनशैली आणि व्यस्त दिनचर्येमध्ये ध्यानासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. १० मिनिटांच्या ध्यान सत्राने तुम्ही तुमचा ताण कसा कमी शकता यावर चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी, कर्मचान्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर ध्यान अभियानद्वारे एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हर घर ध्यान अभियान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशभरात चालविले जाणार आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेत ध्यान शिबिर घेण्यात आले. यावेळी मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तणाव व्यवस्थापन तसेच आनंदी जीवनाचे रहस्य जाणून घेतले.

शिबिराच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मुग्धा तरुण खांडे यांच्या पुढाकारातून योगिता वानखेडे, रवींद्र लाखे, वृंदा लाखे, प्रीती संघवी, स्वाती बच्चूवार या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमूने मनपा

अधिकारी-कर्मचाऱ्यांना तणाव व्यवस्थापन व आनंदी जीवनाचे रहस्य याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी राहण्याचे तंत्र व तणाव मापन चाचणी घेण्यात आली.

आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी सर्वांनी निरोगी आयुष्य जगण्याच्या दृष्टीने व्यायाम तसेच योग व ध्यान करण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, सहायक संचालक नगररचना सुनील दहीकर, उपअभियंता विजय बोरीकर, अनिल घुमडे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleमोवाडा गावात महिलांचे ग्राम स्वच्छता अभियान.
Next articleयोगीता लांडगे यांचा महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here