Home वरोरा योगीता लांडगे यांचा महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान.

योगीता लांडगे यांचा महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान.

जिल्ह्याचे  पालकमंत्री तथा वने व संस्क्रुतिक मंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार.

वरोरा :-

सामाजिक कार्यांत नेहमीच अग्रेसर व महिलांना योग्य ते समुपदेशन करून समाजाच्या नवनिर्मितित आपले सर्वोच्य योगदान देणाऱ्या समाजसेविका तथा प्रखर वक्त्या योगिता लांडगे ( ईनामे) यांना महाराष्ट्र शासनाच्या महीला व बालविकास विभागाच्या वतीने सन २०१५-२०१६ च्या जिल्हास्तरीय पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने महाराष्ट्र दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले, वरोरा येथिल योगीता लांडगे ( ईनामे) यांचे समाज सुधारणेत महत्वपूर्ण कार्य आहे, शिवाय त्या पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या समुपदेशन केंद्रात समुपदेशक म्हणून कार्य करत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून १ मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहनाच्या समारंभामधे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने व संस्क्रुतिक मंत्री सुधिर भाऊ मुंघटीवार यांच्या हस्ते, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधीकारी, विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जासन, पोलिस अधिक्षक परदेशी, जिल्हा महीला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत ह्यांचे प्रमुख उपस्तिथिमधे सदर पुरस्कर प्रदान करन्यात आला.

योगीता लांडगे या शासनाच्या यंशवंतराव चव्हान प्रशिक्षण, प्रभोधनी पुणे सोबत गेल्या २५ वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून जुळलेल्या आहे. प्रगती बहुउद्देशिय संस्था वरोरा च्या माध्यमातुन त्यानी महीलाच्या आणि बैंकांच्या विविध शासकीय समीत्यावर सल्लागार म्हणुन कार्य केले आहे तसेच बालकल्याण समिती मधे कार्य करून कामाचे ठीकाणी महीलाचे लौगिक शोषण निवारण करीत आहे व त्या महीला व बाल सल्लागार समिती सदस्य, बालविवाह प्रतिबंध सदस्य व वरोरा पोलिस स्टेशन ला समुपदेशक म्हणुन गेल्या पंधरा वर्षापासुन महीलांच्या प्रश्नावर्ती अतीशय तळमळिने कार्य करित आहे. त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच च्या माध्यामातुन महीलांना विविध जीवणकौशल्य प्रक्षिशण, महीला लोकप्रतीनिधीचे उत्त्म विकासा संदर्भातील तज्ञ मार्गदर्शक, शासनाच्या महीला व बालविकासच्या विविध योजनंची प्रचार, प्रशीद्धी व तज्ञ मार्गदर्शक म्हणुन तळमळीचा त्यांचा प्रयत्न, महिलांना लाभ पोहचविण्यासाठी त्या सतत महीला मेळावे, किशोरी मेळावे, वाईसभा उत्तमसभा महीला सभा, शाळंना भेटी अनौतिक व्यापाराला प्रतीबंधक करण्यास महीलांना भेटी अशा विविध समाजपयोगी उपक्रमामधे सहभागी असतात.

कोरोनाच्या काळात त्यानी वंचीत विधवा सुक्षिशीत बेरोजगार महीलाना हाताशी धरून कापडी मॉडल तयार केले व महीलाना उदर्निवाहाकरिता आर्थिक मदत पोहचविली त्यामुळे त्यांच्या पाठिशी अनेक महिलाचे संगठना उभे आहे. व त्याचे या पुरस्कारा बद्दल त्याचे सरपंच संघटना आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका मदतनिस, पोलीस कर्मचारी, लोकप्रतिनीधी, अधिकारी, आणि राष्ट्रसंत तुकडोजी माहाराज संघ, मानवधर्म समिती व मित्र परिवार यांची शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here