Home क्राईम स्टोरी तेजस्विनी पत संस्थेचे एजंट व ठेवीदार उद्या पोलीस अधीक्षक यांच्याकडे धडकणार.

तेजस्विनी पत संस्थेचे एजंट व ठेवीदार उद्या पोलीस अधीक्षक यांच्याकडे धडकणार.

दत्ता बोरेकर व नर्मदा पेंदोर (बोरेकर) यांच्यावर गुन्हे दाखल होणार?

चंद्रपूर दिनांक 11मे :-

वरोरा येथील तेजस्विनी नागरी सहकारी पत संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा नर्मदा पेंदोर व त्यांचे पती दत्ता बोरेकर या पतीपत्नीने वरोरा शहर व तालुक्यातील ठेवीदार यांच्याकडून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी घेऊन त्या पैशाची अफरातफर केल्याने व त्यांच्याकडून ठेवीदारांची फसवणूक होतं असल्याने संस्थेचे ठेवीदार व एजंट यांनी आता या प्रकरणी मनसेच्या विधी विभागाच्या जिल्हाध्यक्षा अँड मंजू लेडांगे यांच्या नेत्रुत्वात उद्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे भेट निश्चित केली आहे, दरम्यान या प्रकरणी उद्या दत्ता बोरेकर व नर्मदा पेंदोर यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

तेजस्वीनी नागरी सहकारी पत संस्था सन 2014 ला स्थापन झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा नर्मदा पेंदोर व दत्ता बोरेकर यांनी आपल्या राजकीय पदाचा दुरुपयोग करून वरोरा शहरातील नागरिकांसह ग्रामीण मधे टेमुर्डा, खांबाडा, माढेळी, नागरी, शेगांव इत्यादी गावांतील एजंट व ठेवीदार यांच्या माध्यमातून दैनिक ठेव, मासिक , वार्षिक ठेव व फिक्स डिपॉझिट असे मिळून जवळपास 2 ते 3 कोटी रुपयांच्या गुंतवणूकी घेतल्या व सन 2017 पर्यंत या संस्थेत जमा झालेले पैसे संस्थेच्या अध्यक्षा नर्मदा पेन्दोर व त्यांचे पती दत्ता बोरीकर यांनी स्वतःकडे ठेऊन स्वतःच्या स्थावर मालमत्ता उभ्या केल्या पण मुद्दत संपून देखील ठेवीदारांना त्यांच्याकडून पैसे मिळाले नसल्याने संस्थेच्या एजंट व ठेवीदार हे मागील सहा ते सात वर्षांपासून दत्ता बोरेकर व नर्मदा पेंदोर यांच्याकडे चकरा मारत आहे पण अगोदरच जनतेला भूलथापा देऊन राजकारण करणाऱ्या या जोडगोळीने ठेवीदार यांना उलट धमक्या देऊन व पोलीस प्रशासनावर दबाव टाकून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

दरम्यान संस्थेच्या एजंट व ठेवीदारांनी सन 2019 मधे या संस्थेच्या संचालकांविरोधात पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली पण पोलिसांनी कारवाई केली नाही व आता सुद्धा दिनांक 28/1/2023, 27/2/2023 व 31/3/2023 ला पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. एकीकडे पोलीस संस्थेच्या संचालकांवर कारवाई करत नाही तर दुसरीकडे संस्थेच्या अध्यक्षा नर्मदा पेन्दोर व तिचे पती एजंट व ठेवीदारांना जीवे मारण्याच्या धमक्या देतात त्यामुळे हा विषय आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आला असून संस्थेच्या एजंट व ठेवीदारांना न्याय देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा व जिल्हा उपनिबंधक व विभागीय सहनिबंधक यांच्याकडे तक्रारी देऊन संस्थेच्या अध्यक्षासह इतर संचालकांवर ठेवीदारांचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरणार आहे. त्यामुळे उद्या दिनांक १२ मे ला जिल्हा पोलीस अधीक्षक काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी दत्ता बोरेकर व नर्मदा पेंदोर यांच्यावर गुन्हे दाखल होणार? असे संकेत मिळत आहे.

अन्यथा आत्महत्या करेंन -नलिनी जोगे

तेजस्वीनी नागरी सहकारी पत संस्थेच्या एजंट नलिनी जोगे यांनी जवळपास 7 लाख रुपयांची ठेवीदारांनी दिलेल्या ठेवी संस्थेत जमा केल्या पण त्यांना त्या मुद्दत संपल्यानंतर सुद्धा परत मिळाल्या नसल्याने ठेवीदार त्यांच्या घरी जायच्या पर्यायाने नलिनी जोगे यांनी स्वतःचे सोने विकून व व्याजाने पैसे काढून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या पण आता उधार घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने व त्यांना कर्जापोटी मानसिक त्रास सहन करावा लागतं असल्याने त्यांच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते व आठ दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. दरम्यान आता हे प्रकरण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे गेल्यानंतर जर आठवडा भरात न्याय मिळाला नाही व ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांनी त्रास दिला तर दत्ता बोरेकर व नर्मदा पेन्दोर यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन असा इशारा नलिनी जोगे यांनी दिला आहे.

Previous articleयोगीता लांडगे यांचा महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान.
Next articleशक्तिशाली राष्ट्र निर्मितीसाठी व्यसनमुक्त समाजाची गरज – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here