Home चंद्रपूर काळी फिल्म आठशेची; दंड ठोठावणार पाचशेचा!

काळी फिल्म आठशेची; दंड ठोठावणार पाचशेचा!

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :-  चारचाकी वाहनाला काळी फिल्म लावणे वाहतूक नियमांनुसार दंड असूनही अनेक वाहन चालक आपल्या वाहनांना सर्रास काळी फिल्म लावत असल्याचे दिसून येतात. अशांवर वाहतूक पोलिस कारवाई करून पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्या कारवाईत दीड हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येत असतो. त्यामुळे वाहनाला केवळ आठशे रुपयांची काळी फिल्म अन् दंड पाचशेचा, अशी म्हणण्याची वेळ येऊ शकते.

काळ्या फिल्मचा व्यवसाय जोरात कार डेकोर वाल्यांना दंड करनार का ?

कार डेकोर करणारे काळ्या फिल्म वाहनाला लाऊन देतात. यांत आतील माणसाला बाहेरचे दिसते; परंतु बाहेरील माणसाला आतले दिसत नाही अश्या काळ्या फिल्म दुकानात ठेवणे व गाड्यान काळ्या फिल्म लावून देने  हे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. काळ्या फिल्मचा व्यवसाय करणाऱ्यांवर पण पोलीस प्रशासन कारवाई करणार का यांच्या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत.

 

कोणत्याही वाहनाची काच ही पारदर्शक असावी, जेणेकरून वाहनात कोण बसून आहे त्याची माहिती इतरांना मिळावी, या अनुषंगाने वाहनांना काळ्या काच बसवणे कायद्याने गुन्हा आहे. अशांवर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करत असतात. तरीही अनेक जण आपल्या वाहनांना सर्रास काळी फिल्म बसवत असल्याचे दिसून येते. मात्र, असे वाहन पोलिसांच्या नजरेस पडले, तर दीड हजारांपर्यंतच्या दंडाला सामोर जावे लागते.

Previous articleचंद्रपुरात पाणी समस्या तर मग लावा या नंबर वर फोन
Next articleसीडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा सूत्रधार कोण ? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here