Home चंद्रपूर सीडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा सूत्रधार कोण ? 

सीडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा सूत्रधार कोण ? 

शिवसेनेचे रवींद्र शिंदे यांच्यावर पण हल्ला होण्याची का व्यक्त होतं आहे शंका ?                                                                        चंद्रपूर :

जिल्ह्याच्या राजकारणात गुंड माफियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झाल्याने सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे, दरम्यान राजकीय स्पर्धेत यांचं गुंड माफियांच्या माध्यमातून वर्चस्वाच्या लढाया होतं असल्याचे विदारक चित्र मागील काही वर्षात दिसत असल्याने जिल्ह्यात यूपी बिहार सारखी स्थिती होतांना दिसत आहे. आता तर चक्क सीडीसीसी बैंकेच्या अध्यक्षांवरच गोळीबार झाल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातं असल्याची जाहीर वाच्यता केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळं संतोष रावत यांच्यावरील हल्ल्यात प्रमुख सूत्रधार हा मोठा राजकीय पुढारी असल्याची शक्यता वर्तवली जातं असल्याने त्या सूत्रधाराच्या मुसक्या पोलीस प्रशासन आवळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात असे प्रकार कधी होतं नव्हते मात्र आता शांत व सुसंस्कृत परंपरा असलेल्या राजकारणाला काही गुंड प्रव्रुत्तिचे राजकारणी गालबोट लावून व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून लोकशाहीचीच हत्त्या करायला निघाले असल्याचे प्रकार वाढताना दिसत आहे त्यामुळं  चिंता, चिंतन आणि विचार करण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे. जिल्ह्यात राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींवर होणारे हल्ले व त्यातून आरोपी व त्या गुन्ह्याच्या मास्टरमाईंड वर होतं नसलेली कारवाई यामुळे हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच अंकुश लावला गेला नाही तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा जगणे मुश्किल जाईल अशी भीती व्यक्त होतं आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचेवर (दि.११ मे ) ला गोळीबार झाला, हा भ्याड हल्ला राजकिय षडयंत्राची भाग असू शकतो अशी भीती व्यक्त होतं आहे आणि या हल्ल्याचा मास्टरमाईंड सूत्रधार हा राजकीयच जर असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी होने गरजेचे आहे. जिल्ह्यात यापूर्वी राजकीय वैमनस्यातून बल्लारशहा येथे अशीच एक हत्या करण्यात आली होती. चंद्रपूर येथे माजी नगरसेवक नंदु नागरकर यांचेवर हल्ला करण्यात आला. नागरकर हे वारंवार सांगत आहे कि अटक केलेले हल्लेखोर हे बनावटी गुन्हेगार आहेत. त्यामुळं गुन्हेगार हे अद्याप मोकाट आहेत पण पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत मुख्य आरोपीला अटक केली नाही. भद्रावती येथील माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांचे वर हल्ला करण्यात आला. भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे यांचे वर देखील हमला करण्यात आला, वरोरा येथील माजी नगरसेवक पप्पू साखरीया यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला व राजू कुकडे या पत्रकारावर हमला झाला. दरम्यान संतोषसिंह रावत यांचेवरील हा सातवा हल्ला असून राजकीय गुंडगिरीने दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर पोलीस प्रशासनाने वेळीच पावले उचलून ते सूत्रधार, मास्टरमाईंड व पडद्यामागील ते कोण आरोपी आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे

रवींद्र शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट ?

जिल्ह्यात राजकीय सूडाच्या भावनेने झालेले भ्याड हल्ले हे चिंतेचा विषय असतांना आता वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यावर पण हल्ला करण्याचा बेत आखण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत काही पुराव्यासह माहीती त्यांनी पोलिस खात्याला पुरविली असल्याचे एका प्रशीद्धी पत्रकाद्वारे त्यांनी सांगितले आहे, दरम्यान असे सर्व हल्ले राजकिय षडयंत्राचा भाग असून राजकारणात विरोध करणारे, प्रस्थापितांच्या विरोधात स्वतःचा ठसा उमटविणारे, पत्रकारितेत निष्पक्ष लिहिणारे, असे अनेक या हल्ल्यांच्या रडारवर राहू शकतात. त्यामुळे आधीच्या सर्व हल्ल्यांची निकोप चौकशी करून या सर्व हल्ल्यांचा सूत्रधार एक तर नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे. या घटनांमुळे अभीव्यक्ती स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला असुन राजकिय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना अश्या प्रकारे धमक्या व भ्याड हल्ला करुन दहशतीचे वातावरण जिल्ह्यात निर्माण केले जात असल्याचा आरोप रविंद्र शिंदे यांनी केला आहे.

या प्रकरणाची चौकशी साहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्याकडे द्या.

जिल्ह्यात जिथे राजकारणी व पत्रकार सुरक्षित नाही तिथे सामान्य जनता कशा प्रकारे सुरक्षित राहु शकते? हा प्रश्न सर्वसाधारण जनतेला पडला आहे. दरम्यान येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका बघता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या घटनांचा तपास होऊन त्या मुख्य सूत्रधाराला जेरबंद करण्यासाठी निष्पक्ष चौकशी करावी व हा तपास गृह खात्याने वरोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा साहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोप्पानी यांचे कडे देण्यात यावी, अशी मागणी रविंद्र शिंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here