Home चंद्रपूर मनपाचे पाणीटँकर चालक सत्कार सोहळ्याने भारावले प्रदेश युवक काँग्रेसतर्फे सत्कार सोहळा

मनपाचे पाणीटँकर चालक सत्कार सोहळ्याने भारावले प्रदेश युवक काँग्रेसतर्फे सत्कार सोहळा

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  तप्त उन्हाच्या झळा सोसत चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व टँकर चालकांचा प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव इंजि. रमिज शेख यांच्या पुढाकाराने सत्कार करण्यात आला. पहिल्यादांच टँकर चालकांचा असा सत्कार झाल्याने ते भारावून गेले होते.चंद्रपूर शहराचे तापमान पहिल्यादाच देशपातळीवर नवा उच्चांक गाठत आहे.त्यामुळे शहरातील काही भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पाणीटंचाई दूर करण्याच्या अनुषंगाने मनपा पाणीपुरवठा विभागातर्फे शहरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरचालक तप्त उन्हाच्या झळा सोसत नियमितपणे पाणी वितरण करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रदेश युवक काँग्रेसतर्फे टँकर चालक तसेच पाणीपुरवठा अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. पहिल्यांदाच टँकर चालकाच्या असा सत्कार झाल्याने ते भारावून गेले होते. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here