Home वरोरा कृषी वार्ता ;- खरीप हंगामपूर्व नियोजनाकरिता कृषी विभागाचा अभिनव उपक्रम.

कृषी वार्ता ;- खरीप हंगामपूर्व नियोजनाकरिता कृषी विभागाचा अभिनव उपक्रम.

बियाणांची उगवणक्षमता तपासणी बाबत प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण संपन्न.

वरोरा :-(मनोहर खिरटकर)

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यासाठीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करण्याकरिता खरीप हंगामपूर्व नियोजन करिता वरोरा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रशिक्षण टेमुर्डा येथील ग्रामपंचायत सभागृहात दि 17 मे 2023 रोजी देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमकरिता उदघाटक म्हणून बदकी व प्रमुख पाहुणे पावडे हे अनुभवी शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषि अधिकारी वरोरा अधिनस्त मंडळ कृषि अधिकारी, टेमुर्डा यांचेमार्फत प्रशिक्षण आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रशिक्षणात श्री. गणेश इढोळे कृषि सहायक यांनी उगवणक्षमता तपासणी बाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले तसेच निलेश टिपले कृषि सहायक यांनी बिजप्रक्रिया विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

फलोत्पादन अभियान अंतर्गत शेतकरी लाभाच्या विविध योजनांविषयी श्री गोविंद देशमुख कृषि सहायक यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले तसेच ऋषी वाघ कृषि सहायक यांनी फळबाग लागवड व इतर योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि विभागामार्फत विविध योजनांचा लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून उत्पादकता वाढविण्यासाठी या योजनांचा लाभ झाल्याचे स्पष्ट केले. यामध्ये प्रामुख्याने श्री विठ्ठल हटवार, श्री सुयोग लडके, श्री श्रीकांत एकुडे, श्री अशोक देठे यांनी मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पिक स्पर्धा अंतर्गत विभागस्तर, जिल्हास्तर तसेच तालुकास्तरावर सोयाबीन पिक स्पर्धा विजेते श्री बापुराव नन्नावरे, श्री विलास खडसंग, श्री श्रीकांत खंगार, श्री श्रीकृष्ण धवणे यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व सत्कारमूर्तींनी अधिक उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपुढे मांडून सविस्तर मार्गदर्शन केले.

उत्पादकता वाढविण्यासाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषि यांत्रिकीकरण व फळबाग लागवडीतुन समृद्धी तसेच अन्नप्रक्रिया उद्योग उभे करून शेतकऱ्यांमधून उद्योजक घडविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन कु. प्रगती चव्हाण, मंडळ कृषि अधिकारी टेमुर्डा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किशोर डोंगरकार कृषि पर्यवेक्षक यांनी केले. या प्रशिक्षणातून आत्मसात केलेले तंत्रज्ञान येत्या खरीप हंगामात उत्पादनखर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यास नक्कीच उपयोगी पडेल असा विश्वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here