Home वरोरा वरोरा जिनिंगमध्ये कापूस खरेदी करतांना शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा.

वरोरा जिनिंगमध्ये कापूस खरेदी करतांना शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा.

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विशाल पारखी यांची नवनिर्वाचित बाजार समिती सभापती डॉ. देवतळे यांच्याकडे मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकार क्षेत्रात सात जिनिंग आहे. यातील काही जिनिंगमध्ये कापूस खरेदी करताना शेतमालाला नियमानुसार योग्य तो सर्व जिनिंग मधे सारखा भाव न देता त्या जिनिंग मधे कापूस घेऊन येणाऱ्या काही वाहनचालकाला कमिशन च्या नावाने लाच दिली जाते आणि शेतकऱ्यांची कमी भाव देऊन आर्थिक फसवणूक व पिवळणूक केल्या जाते ही व्यवस्था त्वरीत बंद करा व शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव द्या व ही फसवणूक थांबविण्यासाठी सर्व जीनिंगमध्ये लिलाव पद्धतीने कापूस खरेदी करा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे वरोरा तालुका अध्यक्ष विशाल पारखी यांनी नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. विजय देवतळे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकार क्षेत्रात सहा ते सात जीनिंग येतात. त्या जीनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून अधिकृतरित्या मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला जातो. परंतु शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना त्यांची आर्थिक फसवणूक व पिळवणूक होते. तसेच शेतकऱ्याचा शेतमाल दलाल व व्यापाऱ्यांना विकल्यानंतर ज्या वाहनांमध्ये तो जीनिंगमध्ये आणला जातो. त्या वाहनाच्या चालकाला बेहिशोबी दलाली लाचेच्या रूपात दिली जाते. यामुळे असे वाहनचालक सरसकट ज्या जिनिंगमध्ये समाधानकारक दलाली मिळते त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतमाल त्या शेतकऱ्यांना भुलथापा देऊन घेवून येतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे वरोरा तालुका अध्यक्ष विशाल पारखी यांनी केला आहे

दरम्यान शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देखील मिळत नाही. त्यामुळे सदर प्रकारे होत असलेली शेतकऱ्यांची आर्थिक लूट त्वरित थांबवावी आणि कापसाची खरेदी ही लिलाव पद्धतीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती डॉ. विजय देवतळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकिशोर हरणे, विशाल धंदरे आणि तालुक्यातील महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here