Home वरोरा शैक्षणिक :- स्पंदन गांधी बोरकर या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश,

शैक्षणिक :- स्पंदन गांधी बोरकर या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश,

नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सुद्धा पास झालेला स्पंदन शिक्षणाचे पुढील टप्पे पादाक्रांत करण्यास उत्सुक.

                                                                                        चंद्रपूर :प्रतिनिधी –

महाराष्ट्र राज्य शासकीय परिक्षा परिषद पुणे, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी आयोजित फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला असून शिष्यवृत्ती परीक्षेत वरोरा येथील सेन्ट ॲनिस हायस्कूल मधिल इयत्ता 9 वी चा विद्यार्थी स्पंदन शालिनी गांधी बोरकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शिक्षणाच्या स्पर्धेत नवनवीन टप्पे पादाक्रांत करण्याचा जणू संकल्प केला आहे. अगोदर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत अव्वल आलेला स्पंदन आता शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

सन 2020 ला स्पंदनची नवोदय विद्यालय बाळापुर तळोधी येथे प्रवेशासाठी सुध्दा निवड झालेली होती .तसेच फेब्रुवारी 2020मध्ये इयत्ता 5वी साठी घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा सुयश प्राप्त करून यशस्वीरीत्या पात्र झाला होता. स्पंदनने संपादित केलेल्या घवघवीत यशाबद्दल सेन्ट ॲनिस हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, मित्र परिवार तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे. स्पंदन ने त्याच्या यशाचे श्रेय आजी अनुसया वाघमारे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि आई वडिलांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here