Home Breaking News विसापूर मधील भुरट्या चोरांना आवर घाला हो… लोखंड व टाईल्स नेत आहेत...

विसापूर मधील भुरट्या चोरांना आवर घाला हो… लोखंड व टाईल्स नेत आहेत चोरून

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

विसापूर :-  जुने पॉवर हाऊस परिसरातील सबस्टेशनपासून ते तालुका क्रीडा संकुल विसापूर- बल्लारपूर पर्यंतच्या रोडच्या दोन्ही बाजूच्या नालीवरील आच्छादनातील लोहा व टाईल्स भुरटे चोर तोडून घेऊन जात असल्याने रोडचे विद्रुपीकरण व अपघातचा धोका होण्याची शक्यता वाढली आहे.

त्यामुळे या भुरट्या चोरांना आवरा हो…. अशी आर्त हाक व मागणी  विसापूरकर करीत आहे जुने पावर परिसरातील सबस्टेशनपासूनते तालुका किर्डा संकुल विसापूर

बल्लारपूर पर्यंतच्या रोडच्या दोन्ही बाजूच्या नालीवर आच्छादने व टाईल्स लावून रोड सुशोभित करण्यात आला होता. त्यामुळे रोडवरील पाणी जाण्यासाठी मार्ग व दोन्ही बाजूला सुरक्षित कठडे असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनासाठी सुरक्षित होते. परंतु जेव्हापासून भुरट्या चोरांचे लक्ष त्याकडे गेले, तेव्हापासून रोडचे विद्रुपीकरण व वाहनासाठी धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विसापूर ग्रामस्थ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here