Home Breaking News ऐकावं ते नवलंच चक्क ग्रामपंचायतने केली विज चोरी, दोन वर्षांनंतर महावितरण कंपनीच्या...

ऐकावं ते नवलंच चक्क ग्रामपंचायतने केली विज चोरी, दोन वर्षांनंतर महावितरण कंपनीच्या आले लक्षात

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

धानोरा  :-  तालुक्यातील मुख्यालयापासून काही अंतरावर असलेली गट ग्रामपंचायत चिंचोली येथील विज वितरण कंपनीने धाड टाकून ग्रामपंचायत मधील विद्युत चोरी पकडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

अधिक माहिती याप्रमाणे आहे की, गट ग्रामपंचायत चिंचोली येथील कार्यालयातील विद्युत बिल न भरल्याने विज वितरण कंपनीने विद्युत प्रवाह खंडित करून नियमानुसार त्यांना थकित असलेले देयक भरण्यास ग्रामपंचायतला कळविण्यात आले होते

त्यानंतर थकीत वीजबिल ग्रामपंचायत कार्यालयाने भरणा केलेले नाही मात्र ग्रामपंचायत कार्यालयाला विद्युत रोषणाची अत्यंत आवश्यकता भासत होती या यामध्ये ऑनलाईन दाखले अनेक कामे ऑनलाईन प्रणाली द्वारे करायचे असल्याने यामध्ये विद्युतची आवश्यकता भासत होती म्हणून ग्रामपंचायत ने थेट खांबावरुन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विज कनेक्शन जोडले

यामध्ये ग्रामपंचायतचे अनेक कामे करण्यात येत होते यातच पंखे, कुलर, विद्युतबल सुद्धा सुरू होते, हा प्रकार दीड ते दोन वर्षापासून सुरू असून याची माहिती महावितरण कार्यालय धानोरा यांना माहित होताच तात्काळ कार्यालयीन पथक चिचोली येथे २५ मे ला सकाळी अकरा वाजता चिंचोली येथील ग्रामपंचायत मध्ये जाऊन चोरीने सुरू असलेला विद्युत पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला त्याचबरोबर जवळपास दीडशे फुट सर्विस वायर महावितरण कंपनीने जप्त केला आहे, यावेळी सहायक अभियंता एन बी नन्नावरे यांनी ही प्रक्रिया पार पडली, घटनास्थळी पंचा समक्ष पंचनामा केला

असून यावर महावितरण कंपनी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याविषयी ग्रामपंचायत चिंचोली येथील ग्रामसेवक यांना भ्रमणध्वनी द्वारे विचारणा केली असता मला ह्या गावात येण्या पूर्वी पासून हे प्रकार सुरू आहेत अशी माहिती त्यांना ग्रामसेवकांनी दिली यावरून असे वाटते की हा प्रकार दोन वर्षांपूर्वी पासून सुरू होता मात्र विज वितरण कंपनीच्या हे लक्षात आले नाही किंवा कर्मचारी डोळेझाक करीत होते काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या ग्रामपंचायत चे ग्रामसेवक हे चिंचोली येथे रुजू होऊन जवळपास दीड वर्ष चा कालावधी झालेला आहे तेव्हा त्यांनी सुद्धा थकीत वीजबिल भरणा केला नाही व दुर्लक्ष केले असे दिसून येते आहे. दीड वर्षांमध्ये सदर ग्रामसेवकांच्या हा प्रकार लक्षात आलाच कसा नाही हाही प्रश्न उपस्थित होतो आहे

यावरून असे सिद्ध करण्यासारखं आहे की दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे कृत्य राजरोसपणे सुरू ठेवले आहेत व हे कर्मचारी आपल्या कर्तव्याप्रती कीती जागरूक आहेत हेही दिसून येत आहे त्यामुळे ग्रामसेवक, सरपंच, व विज वितरण चे कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Previous articleशिक्षणाच्या आईचा घो ७१२ विद्यार्थ्यांची नावे दोन आश्रमशाळेच्या हजेरीपटात
Next articleमहिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचा उद्योजकीय विकास व्हावा – आ. किशोर जोरगेवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here