Home चंद्रपूर धक्कादायक :- खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्ली येथे दुःखद निधन.

धक्कादायक :- खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्ली येथे दुःखद निधन.

राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, जिल्ह्यात पसरली शोककळा.

चंद्रपूर प्रतिनिधी :

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर आपली अमीट छाप उमटविणारे व अगदी कमी कालावधीत सर्वोच्य राजकीय कामगिरी करणारे खासदार बाळू धानोरकर यांचे आज दिनांक 30 मे रोज मंगळवार ला दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये रात्री 2.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

आज दिनांक 30/05/2023 ला मंगळवार ला त्यांचा मृतदेह एअर एम्बुलन्स न्यू नागपूर ला व नंतर वरोरा येथे आणण्यात येणार आहे व त्यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी 2.00 वाजेपासून ते 4.00वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.

Previous articleमनपा तर्फे बीजेएम कार्मेलला स्वच्छतेचा द्वितीय पुरस्कार
Next articleदुर्दैवी :- खासदार धानोरकर यांचा कोणत्या आजाराने झाला मृत्यु? हे कारण आले समोर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here