Home चंद्रपूर दुर्दैवी :- खासदार धानोरकर यांचा कोणत्या आजाराने झाला मृत्यु? हे कारण आले...

दुर्दैवी :- खासदार धानोरकर यांचा कोणत्या आजाराने झाला मृत्यु? हे कारण आले समोर.

राजकीय घडामोडी पण ठरल्या का कारणीभूत ? दबक्या आवाजात चर्चा.

चंद्रपूर :-

महाराष्ट्रातील काँग्रेस चे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे काल पहाटे ला दिल्लीच्या (गुडगाव) मेदांता या खाजगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती, वयाच्या ४७ व्या वर्षी एखाद्या आजाराने निधन व्हावे ही समाजमनाला चटका लावून जाणारी बाब आहे, पण यामागची कारणे पण तेवढीच महत्वाची असून खासदार बाळू धानोरकर यांना पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दोन दिवसांपासून दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. २०१४ ला ते आमदार असताना त्यांच्यावर स्थुलतेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही पत्थ्य पाळावे लागतात. दरम्यान अगोदरच प्रक्रुतिची गंभीर बाब असताना  दबक्या आवाजात चर्चा प्रमाणे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि त्यातच त्यांचा मेहुणा यांना आलेली ईडीची नोटीस यामुळे त्यांचे मानसिक टेंशन वाढल्याने त्यांचे मद्य सेवन वाढले आणि त्यातच त्यांचा घात झाला,  त्यांनी स्वतःच्या प्रक्रुतिकडे लक्ष दिले नाही पर्यायाने त्यांच्या आतळ्यामध्ये गुंतागुंत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण समोर येत आहे.

नागपुरात शुक्रवारपासून ते भरती होते. शनिवारी किडनी स्टोनचे ऑपरेशन झाले. त्यानंतर आतळ्यात इंफेक्शन असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. खासदार बाळू धानोकर यांच्या पार्थिवावर वरोरा येथे आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तींनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here