Home वरोरा खासदार बाळू धानोरकर यांना अखेरची सलामी. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

खासदार बाळू धानोरकर यांना अखेरची सलामी. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

एका धाडसी लढवय्या नेत्याच्या युगाचा अंत, पाठीराखे पोरके झाल्याने त्यांच्यासमोर पुढचा प्रश्न                 

वरोरा प्रतिनिधी :-
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाचे खासदार स्वर्गीय सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्य वर्षी काल मंगळवारी (30 मे) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वरोरा येथील मोक्षधाम येथे बुधवारी 31 मे रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवाला अग्नी देत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली. मोठा मुलगा मानस धानोरकर याने पार्थिवाला अग्नी दिली. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत 3 फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
.           खासदार बाळू धानोरकर यांच्या अंत्यदर्शनासाठी वरोरा शहरासह चंद्रपूर जिल्ह्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकत्यानी मोठी गर्दी केली होती. एवढेच नव्हे तर अंत्यदर्शनासाठी राज्यातील मोठे नेते दाखल झाले होते, त्यांनी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मान्यवरांनी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सांत्वन केले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल देशमुख, आमदार सुनील केदार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार यशोमतीताई ठाकूर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह विदर्भातील नेत्याची उपस्थिती होती. या सर्वानी शोकसभेत आपल्या शोक सवेन्दना व्यक्त करून खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

एका धाडसी लढवय्या नेत्याच्या युगाचा अंत.

देशातील व राज्यातील काही नेत्यांच्या दबंगगिरिचा काही काळ राहिला आहे. त्या काळात ते गाजले व नंतर त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्याचं प्रमाणे बाळू धानोरकर यांनी आपली दबंगगिरी दाखवून राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली खरी पण कालपरत्वे त्यांचा अतीमहत्वाकांक्षीपणा त्यांना भोवला, दरम्यान आपल्या आरोग्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही पर्यायाने अतीलोभाच्या चक्रव्यूहात ते अडकले आणि कोट्यावधी रुपयांची संपती जमवली असतांना सुद्धा त्यांना डॉक्टर वाचवू शकले नाही. खरं तर ही बाब संपूर्ण राजकारणी मंडळींनी समजून घायला हवी,  कारण तुम्ही कितीही संपती कमवा पण त्या पैशातून तुम्हाला तुम्हच आरोग्य मिळवू शकत नाही, तुम्हचा प्राण तुम्ही वाचवू शकत नाही. कारण म्रुत्यु हे अंतिम सत्य आहे आणि ते सर्वांना स्वीकारावच लागते, बाळू धानोरकर हे एक लढवय्ये व धाडसी नेते होते, पण बदललेली विपरीत राजकीय परिस्थिती व भविष्याचा दिसत असलेला काळोख यामुळे त्यांनी जणू हार मानली आणि अगदी कमी काळातच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्या आश्रित कार्यकर्त्यांचे काय होईल ? यांची चर्चा असून त्या सर्वाना आमदार प्रतिभा धानोरकर असेच पुन्हा बळ देऊन खासदार बाळू धानोरकर यांचा वारसा चालवणार् का ? याबाबत भविष्यात होणाऱ्या घडामोडी ठरवतील हेच खरे.
Previous articleदुर्दैवी :- खासदार धानोरकर यांचा कोणत्या आजाराने झाला मृत्यु? हे कारण आले समोर.
Next articleधक्कादायक :- आतंकवादी वापरात असलेल्या एके-47 बंदुकीच्या नावाने बार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here