Home चंद्रपूर धक्कादायक :- आतंकवादी वापरात असलेल्या एके-47 बंदुकीच्या नावाने बार ?

धक्कादायक :- आतंकवादी वापरात असलेल्या एके-47 बंदुकीच्या नावाने बार ?

आतंकवादी दहशतवादी व नक्षली चा हा बार आहे का ? बार मालकाची गुन्हेगारी तपासण्याची गरज.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर नको तिथे व नको त्याला कुठल्याही अटी शर्ती चे पालन केले गेले नसतांना तत्कालीन जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बार चे परवाने वाटले,  त्यात पडोली येथे चक्क आतंकवादी दहशतवादी व नक्षल वापरत असलेल्या एके ४७ या स्वयंचलित रायफल च्या नावाने बार ची मंजुरी मिळाल्याने हा बार आतंकवादी दहशतवादी किंव्हा नक्षलीचा आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. महत्वाची बाब म्हणजे एके-47 बार च्या फलकावर एके 47 ची प्रतिमा पण दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एके ४७ या स्वयंचलित रायफल आहे. सोव्हिएत युनियनच्या सैन्याने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस १९४५ साली उत्तम बंदूक बनवण्याची स्पर्धा घेतली होती. त्या वेळी सोव्हिएत लष्करात अधिकारी असलेले मिखाइल कलाशनिकोव्ह यांनी सादर केलेल्या बंदुकीच्या डिझाइनला पारितोषिक मिळाले होते. दरम्यान एके-47 या बंदुकीचा उपयोग आता आतंकवादी जास्त करतात व त्यानंतर एके-56 रायफल चा वापर होतं आहे व अभिनेता संजय दत्त यांच्या जवळ ही बंदूक सापडल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता त्याच बंदुकीच्या नावाने पडोली सारख्या औद्दोगिक गावात जर बार उघडल्या जात असतील तर मग ती मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात का येऊ नये ? शिवाय त्या नावाने बार उघडणाऱ्या बार मालकांवर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये ? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटल्यानंतर जे अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात होते त्यांनी आपलाही बिअर बार असावा म्हणून अवैध दारू विक्रीच्या कमावलेल्या पैशातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वतःच्या बिअर बार ची परवानगी मिळवली. यात दारूबंदी असतांना असे अनेक अवैध दारू विक्री व्यवसायी आहेत जे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हप्ता देत होते व त्यांच्याच मार्गदर्शनात त्यांनी बिअर बार ची परवानगी मिळवली आहे. मात्र जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ए के 47 नावाने बार मंजूर करावा ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. दरम्यान एके-47 नावाने बार ची मंजुरी मिळाली ती तात्काळ रद्द करावी अथवा त्या त्या बार चे नाव बदलावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here