Home चंद्रपूर मनपात होणार ‘त्या’ ३७ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश

मनपात होणार ‘त्या’ ३७ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 चंद्रपूर  :-   प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज-२ (आरसीएच) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर कार्यरत ३७ अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी अधिकाऱ्यांचे चंदपूर महानगरपालिका आस्थापनेवरील आकृतिबंधातील मंजूर पदांवर समावेशन आणि ३३ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याचा प्रश्न निकाली निघाला. नगरविकास विभागाने शुक्रवारी याबाबत शासन निर्णय जारी करून मनपाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महानगरपालिकेतील कंत्राटी पद्धतीने मानधनावर कार्यरत ३७ अधिकारी-कर्मचारी यांना मनपाच्या मान्यताप्राप्त आकृतिबंधातील चार एकाकी पदांवर नियमित सेवेत समावेशन करण्याबाबत, तसेच उर्वरित ३३ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदांवर समावेशन करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी १३ जानेवारी २०२३ च्या पत्रान्वये राज्य शासनाकडे सादर केला होता. २००६ मध्ये सुरू झालेल्या प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज -२ अंतर्गत आरोग्य अभियान राबविण्यासाठी वेगळा कर्मचारीवृंद मंजूर नव्हता. २०१५-२०१६ पासून आजतागायत चंद्रपूर मनपा या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील पूर्ण खर्च उचलत आहे. त्यांना आस्थापनेवर घेण्याच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली. यानुसार कार्यरत ३७ अधिकारी कर्मचारी यांना मनपाच्या मान्यता प्राप्त आकृतिबंधातील चार एकाकी पदांवर सेवेत समावेशन करण्यात येईल. उर्वरित ३३ कर्मचाऱ्यांनाही अधिसंख्य पदांवर समावेशन करण्याबाबतचा प्रस्तावही शासनाने मंजूर केला.

                 यापुढे नवीन पदनिर्मितीचे मार्ग बंद

महानगरपालिकांसाठी विहित केलेली ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज-२ साठी शिथील करण्यात आली. मात्र, पुढील आर्थिक वर्षापर्यंत महानगरपालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या मर्यादितच असावा. जोपर्यंत आस्थापना खर्च विहित मर्यादित येत नाही. तोपर्यंत नवीन पदनिर्मितीचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू नये, असे निर्देशही नगर विकास विभागाने चंद्रपूर मनपाला दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here