Home Breaking News कर्तव्यावर असतानाच ढोसली बीअर; दोन पोलिस निलंबित

कर्तव्यावर असतानाच ढोसली बीअर; दोन पोलिस निलंबित

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  पोलिस बंदोबस्तादरम्यान चक्क बीअर शॉपीमध्ये जाऊन दारू ढोसणाऱ्या दोन पोलिस शिपायांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. त्यामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे. उमेश मस्के, नरेश निमगडे अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.

२ जून रोजी ब्रह्मपुरी येथे जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ब्रह्मपुरी उपविभागातील पोलिसांच्या चमूची ड्युटी लावण्यात आली होती. यामध्ये तळोधी पोलिस स्टेशनमधील पोलिसांचाही समावेश होता. यात उमेश मस्के, नरेश निमगडे कर्तव्यावर होते. दरम्यान, आंदोलन सुरूच असताना मस्के, निमगडे व अन्य एक कर्मचारी असे तिघेजण कर्तव्यावर असतानाच ब्रह्मपुरी येथील एका बीअर दुकानात गेले. एवढेच नाही तर तेथे या पोलिसांनी बसून बीअर ढोसली. याबाबतच ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांना माहिती मिळताच ते त्या दुकानात गेले. ते तिघेही वर्दीवरच बीअर बारमध्ये दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या संपूर्ण बाबींची चौकशी केल्यानंतर त्यांनी या दोघांनाही निलंबित केले आहे. त्यातील एकजण दारू पित नसल्याने त्याच्यावर कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

दुकानाला परवानगी कितीपर्यंत?

दारूबंदी हटल्यानंतर जिल्ह्या दारू दुकान, वाईन शॉपी, बीअ शॉपीची संख्या मोठ्या प्रमाणार वाढली आहे. दारू दुकानाच परवाना देताना संबंधित विभागाने नियमावली ठरवू दिली जाते; परंतु अनेक दुकानदारांकडून त्यांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. अनेक दुकाने ही रात्री दाहा वाजतानंतरही सुरू राहत असल्याचे दिसून येतात. ही कारवाईसुद्ध रात्री १०:३० वाजताच्या सुमारास केली असल्याचं बोलले जात आहे.

Previous articleआश्चर्यच :- माढेळी ग्रामपंचायत सरपंचानीच केले पीडब्ल्यूडीच्या जागेवर अतिक्रमण?
Next articleमनपात होणार ‘त्या’ ३७ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here