Home वरोरा आश्चर्यच :- माढेळी ग्रामपंचायत सरपंचानीच केले पीडब्ल्यूडीच्या जागेवर अतिक्रमण?

आश्चर्यच :- माढेळी ग्रामपंचायत सरपंचानीच केले पीडब्ल्यूडीच्या जागेवर अतिक्रमण?

पीडब्ल्यूडी ने अतिक्रमण तोडल्यास त्याची भरपाई कोण करणार ? माढेळी बाजार परिसरात झालेल्या अतिक्रमणाने दुकानदार अडचणीत असतांना सरपंचाचे दुर्लक्ष का?

विशेष प्रतिनिधी :

माढेळी ग्रामपंचायतच्या जागेवर गावकऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे आजवर अनेक प्रकरणे समोर आली पण ग्रामपंचायतच्या सरपंचांनी पीडब्ल्यूडी च्या जागेवर लोखंडी अँगल गाढून जाण्यायेण्याच्या मार्गावर अतिक्रमण केले असल्याचे पहिल्यांदाच समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. दरम्यान पीडब्ल्यूडी च्या जागेवर अतिक्रमण करून तिथे पार्क बनवल्या जाणार कां ? की आणखी काही बगिच्या बनविण्याचा प्लॅन ग्रामपंचायत मासिक सभेत मंजूर झाला ? याबाबत चर्चा सुरू असली तरी लोखंडी अँगलनी करण्यात आलेलं कंपाऊंडचं अतिक्रमण पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांनी तोडलं तर ग्रामपंचायत च्या त्यां खर्च झालेल्या पैशाचं काय ? काय हा पैशा सरपंचं यांच्याकडून भरपाई होणार कां ? असे प्रश्न उपस्थित होतं आहे.

गावाचे सरपंच म्हणजे गावाचं पुढारपण पण आता ते गावचे पुढारीच नको तिथे अतिक्रमण करून आपल्या अकलेचे तारे तोडताहेत तर मग गावांतील इतरांनी जर सरकारी जागेवर अतिक्रमण केले तर चुकले कुठे ? ज्या ठिकाणी बाजार भरते त्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याने बाजाराला जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो त्यांवर सरपंचांनी उपाययोजना करण्याच्या बदल्यात जर पदाचा दुरुपयोग करून ते स्वतःच्या ग्रामपंचायत ची हद्द असल्याचे दाखवून चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (जागेवर)रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून तिथे लोखंडी अँगल लावून जागा बंदिस्त करीत असेल तर मग ग्रामपंचायत सरपंचाला काय उपाधी द्यायची? हे कळायला मार्ग नाही.

माढेळी ही मोठी बाजारपेठ आहे व येथे जवळपास 15 ते 20 गावचे लोक बाजारासाठी येतात. मात्र या बाजारपेठेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही की बाजारात माल विकणाऱ्या विक्रेत्यांना बसायला धड जागा नाही. सगळीकडं अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली माढेळी ही बाजारपेठ आतातरी छान बनेल या उद्देशाने ग्रामपंचायत मध्ये मागील दोन वर्षांपूर्वी सत्ता परिवर्तन झाले पण सत्ता येताच गावाचा विकास कमी आणि आपलाच विकास साधण्याचा प्रयत्न इथले सत्ताधारी करीत असल्याने मग ते जून का वाईट होते ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

माढेळी गावाचं पुढारीपण कोणाकडे ?

माढेळी गावात मोठं राजकारण घडतंअसं सर्वश्रुत आहे पण या ठिकाणी पुढारपण कुणाकडे आहे ? हा प्रश्न विचारला तर सगळेच संभ्रमातपडतील कारण एकेकाळी प्रकाश मुथ्था हे माढेळी गावाचे सर्वेसर्वाअसायचे त्यानंतर मात्र स्थानिक गावांतील नेत्रुत्व कधी समोर आलं नाही.महत्वाची बाब म्हणजे आजही प्रकाश मुथ्था यांच्या रणनीतीमुळेच ग्रामपंचायत जिंकता येते हे जरी खरं असलं तरी त्यांच्या एवढी राजकीय उंची इथे दिसत नाही.दरम्यान मागील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्याच सहकार तत्वाने सत्ता परिवर्तन झाले पण ज्यांच्याकडे ही सूत्रे आली त्यांनी या गावाच्या विकासासाठी जो विकास आराखडा तयार करून इथे विकास साधायला हवा होता तिथे आज पीडब्ल्यूडी च्या जागेवर अतिक्रमण करून विकासाचं गाजर जनतेला दाखवण्याचा खेळ सुरू आहे.त्यामुळे या गावात कुणीतरी पुढे यावं आणि गावाच्याविकासासाठी प्रयत्न करावे अशी आर्त हाक येथील विकासापासून वंचित नागरिक करीत आहे.

Previous articleरमेश राजूरकर यांना आमदारकीचे लागलेले डोहाळे खरंच पूर्णत्वाला जाणार ?
Next articleकर्तव्यावर असतानाच ढोसली बीअर; दोन पोलिस निलंबित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here