Home चंद्रपूर जगन्नाथ महाराज मठ परिसरातील देशी दारू दुकानाचे स्थानांतरण होणार

जगन्नाथ महाराज मठ परिसरातील देशी दारू दुकानाचे स्थानांतरण होणार

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-   स्थानिक जगन्नाथ महाराज मठ परिसरातील रामसेतू पुलाच्या पायथ्याशी असलेले देशी दारू दुकान स्थानांतरित करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन भवनातील बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले. हे दारू दुकान स्थलांतरित व्हावे, यासाठी नागरिकांनी लक्षवेधी आंदोलन केले होते.

जगन्नाथबाबा मठ व रामसेतू पूल परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवीन देशी दारुभट्टीला परवानगी दिली. दारू दुकानामुळे स्थानिक रहिवासी व ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या परिसरात धार्मिकस्थळ असल्याने तेथील पावित्र्य धोक्यात आले. त्यामुळे दारू दुकानाला तेथून स्थानांतरित करण्याची मागणी जिल्हा प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे स्थानिक नागरिकांनी केली. दरम्यान, माजी उपमहापौर राहुल पावडे यांनीही नागरिकांच्या सहकार्याने आंदोलन केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन भवनात बैठक घेऊन जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देशी दारू दुकानाला स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या. हे दारू दुकान स्थलांतरित करण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे.

Previous articleमनपात होणार ‘त्या’ ३७ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश
Next articleखळबळजनक :- भद्रावती तहसीलदार यांच्या आदेशानंतर सुद्धा माती उत्खनन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here