परिवहन विभागाच्या अधिका-यांशी बैठक, अधिकाऱ्यांना सुचना
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर:- परिवहन विभागाच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. येणा-या या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. आलेल्या तक्रारी प्राथमिकतेने सोडवत प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही असे शुक्ष्म नियोजन करा. अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहण विभागाच्या अधिका-यांना केल्या आहे.
परिवहन विभागाच्या विविध समस्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सदर सूचना केल्या आहे. या बैठकीला परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रक सुतावणे, राहुल मोडक, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सायली येरणे, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हूसेन, शहर संघटक विश्वजीत शहा, छोटा नागपूर उपसरपंच ऋषभ दुपारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अनिता झाडे, निलिमा वनकर, रुपा परसराम, कविता शुक्ला आदींची उपस्थिती होती.
परिवहन हा महत्वाचा विभाग असुन या विभागात काम करणा-या अधिकारी कर्मचा-यांवर प्रवाश्यांची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे आपण आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. नागरिकांच्या सुचनांची दखल या विभागाने घेतली पाहीजे. बस स्थानकावर स्वच्छतेचा अभाव दिसून येतो याकडे गांर्भियाने लक्ष दिल्या गेले पाहिजे. यांत्रिकी विभागात अनेक पदे रिक्त आहे. ती भरण्यात यावी, वढा यात्रे दरम्यान अतिरिक्त बस सोडण्यात याव्यात, चंद्रपूर मतदार संघातील महत्वाच्या ठिकाणी बस थांबा शेडचे निर्माण करावे, जिल्हातील सर्व बस स्थानकामध्ये महिलांकरिता शौचालय निर्माण करावे, बस स्थानकांमधील काही भागामध्ये दिव्यांग आणि महिलांना दुकानांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, एस.टी महामंडळ मधिल उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, सुचना फलक आणि बसेसच्या वेळपत्रकाची माहिती फलक लावण्यात यावे आदी सूचना सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहन विभागाच्या अधिका-यांना केल्या असून चंद्रपूर आणि घूग्घूस बसस्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगीतले आहे. या बैठकीला परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.