Home Breaking News आता नवीन सदस्यांचे नाव रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन ॲड करता येणार !...

आता नवीन सदस्यांचे नाव रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन ॲड करता येणार ! ही आहे प्रोसेस

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

Breaking News  :-   केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेला स्वस्तात धान्य उपलब्ध करून दिले जात आहे.

देशभरातील रेशन कार्ड धारक लोकांना या योजनेच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानात रास्त भावात धान्य उपलब्ध होत आहे. या योजनेच्या माध्यमातून रेशन कार्डमध्ये नाव असलेल्या सदस्यांच्या संख्येनुसार अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. रेशन कार्डचा उपयोग केवळ अन्नधान्य घेण्यासाठी होतो असे नाही तर या कार्डाचा उपयोग अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील होतो.

याचा लाभं शाळकरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी, शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी होतो. अशा स्थितीत जर कुटुंबातील एखाद्याचे सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट झालेले नसेल तर रेशन कार्ड मध्ये अशा सदस्याचे नाव समाविष्ट करणे जरुरीचे आहे. मुल जन्माला आल्यानंतर किंवा नवविवाहित स्त्री घरात प्रवेश करते तेव्हा नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडावे लागते.

यासाठी पूर्वी पुरवठा विभागाकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज केला जात असे. मात्र आता रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन पद्धतीने जोडले जाऊ शकते. दरम्यान, आज आपण रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कशा पद्धतीने जोडले जाऊ शकते? यासाठी काय प्रोसेस असते या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नवीन सदस्यांचे नाव कसे जोडणार

यासाठी आपण सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. किंवा आपण आपल्या राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव अॅड करू शकता.

यासाठी सर्वप्रथम पुरवठा विभागाचा वेबसाइटवर जा आणि फॉर्म क्रमांक 3 डाऊनलोड करा.

हा फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर आता फॉर्म-3 मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. तसेच ज्या व्यक्तीचे नाव जोडायचे आहे त्याचे नाव टाका अन कुटुंब प्रमुखाची माहिती भरा.

भरलेल्या फॉर्मसोबत अंगठ्याचा ठसा किंवा सही करा.

फॉर्म भरल्यानंतर तो CSC केंद्र किंवा अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करा.

त्यानंतर फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर शिधापत्रिकेत नवीन नाव अपडेट केले जाईल.

          कोण-कोणती कागदपत्रे लागणार?

रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत. विवाह प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यांसारखी कागदपत्रे नवीन नाव जोडताना लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here