Home वरोरा धक्कादायक :- खांबाडा येथे महावितरणच्या कंत्राटी तरुण लाइनमनचा शॉक लावून मृत्यू.

धक्कादायक :- खांबाडा येथे महावितरणच्या कंत्राटी तरुण लाइनमनचा शॉक लावून मृत्यू.

कंत्राटी लाईनमन सतीश तोडासे यांच्या मृत्यूला जबाबदार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.

वरोरा प्रतिनिधी(मनोहर खिरटकर )

तालुक्यातील खांबाडा या गावात एका खांबावर चढलेल्या कंत्राटी लाईनमन सतीश तोडासे यांचा भर पावसात इलेक्ट्रिक खांबावर चढल्यानंतर लागलेल्या इलेक्ट्रिक शॉक ने दुर्दैवी म्रुत्यु झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी समोर आली आहे. दरम्यान भर पावसात कंत्राटी लाईनमन याला इलेक्ट्रिक खांबावर चढण्यासाठी प्रव्रुत्त करणाऱ्या महावितरण कंपनी कंत्राटदार व महावितरणचे अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खांबाडा गावांतील नागरिक करीत आहे.

वरोरा तालुक्यात महावितरण कंपनी च्या ढिसाळ धोरणाचा फटका मोठ्या प्रमाणात स्थानिक शेतकरी व गावकऱ्यांना बसत असून महावितरण चे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची कामे गुंतागुंतीची करून त्यांना वीज जोडणी करिता वर्ष चार वर्ष झुलवतात ही नित्याचीच बाब आहे, एवढेच नव्हे तर कंत्राटदाराकडून कमिशन खाऊन कंत्राटी कामगारांचे व कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याने जनतेच्या मुळ कामाकडे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा गंभीर घटना घडत आहे.

Previous articleआता नवीन सदस्यांचे नाव रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन ॲड करता येणार ! ही आहे प्रोसेस
Next article१५ जुलैपासुन ” सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस ” स्पर्धा लोकसहभागातुन शहर सौंदर्यीकरणासाठी मनपाचे प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here