Home Breaking News विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

पुणे  :-  मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत अणुत्तीर्ण (Fail) करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार (New Education Policies) आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट 8वीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आलाय. पाचवी आणि आठावी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा (Annual Examination) घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here