Home चंद्रपूर देवशयनी आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या पायदळ वारीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या पायदळ वारीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-  मेश्देवशयनी आषाढी एकादशी निमित्त बाबूपेठ माऊली परिवार तर्फे काढण्यात आलेल्या पायदळ वारीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त बाबुपेठ माऊली परिवारच्या वतीने बाबुपेठ येथील गुरुदेव चौक येथून पायदळ वारी काढण्यात आली. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील कार्यालया समोर या वारिच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. सदर वारी गांधी चौक होत यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालया समोर पोहोचताच वारीचे स्वागत करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी विठ्ठल रुखमाई च्या मुर्तीला माल्यार्पण करुन नमन केले. यावेळी वारीत सहभागी वारक-यांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, रुपा परसराम, पौर्णिमा बावणे, वैशाली मद्दीवार, वंदना हजारे, सरोज चांदेकर, चंदा वैरागडे, श्याम राजूरकर आदीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here