Home चंद्रपूर चिंताजनक :- राज्यात वीज बिलात मोठी वाढ झाल्यानंतर सुद्धा लोकप्रतिनिधी झोपेत कां...

चिंताजनक :- राज्यात वीज बिलात मोठी वाढ झाल्यानंतर सुद्धा लोकप्रतिनिधी झोपेत कां ?

या लोकप्रतिनिधींना काय शुभेच्छांचे बैनेर व होर्डिंग लावण्यासाठी जनतेने निवडून दिले काय ?

लक्षवेधी :-

सद्ध्या देशात मोदी सरकारनी महागाई आणि बेरोजगारी वाढविल्याने त्यांच्या चष्म्यातून जणू विकास वेडा झालाय असे चित्र दिसत आहे, दरम्यान आता महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारने वाढवलेले वीज बिल आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आलेला ताण आणि परिवाराला पडलेला आर्थिक बोझ्या याबद्दल कोणत्याही पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी काहीही बोलायला तयार नाही हे आश्चर्यच आहे. एरव्ही शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा प्रश्न विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधात असतांना उचलताना म्हटले होते की ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या मोटार पंप चे वीज बिल सावकारी पद्धतीने वसूल करत आहे आणि दुसरीकडे मध्यप्रदेश भाजप सरकार शेतकऱ्यांचे सात हजार कोटी रुपयांचे बिल माफ करत आहे, पण आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर जवळपास एक वर्ष पूर्ण झाले असतांना शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा प्रश्न तर अनुत्तरित आहेच पण या सरकारने वीज ग्राहकांच्या बिलात यूनिट मागे 2 रुपये 30 पैसे वाढवून व स्थिर आकार मधे जवळपास 11 रुपये वाढवून सर्वसामान्य वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. जे वीज बिल 200 ते 500 रुपये यायचे ते आता 1000 ते 2000 रुपये पर्यंत येत असल्याने सर्वसाधारण कष्ट करणारा व मध्यमवर्गीय व्यक्तीच्या परिवारावर मोठा आर्थिक बोझ्या पडला आहे. जनतेवर सरकार लादत असलेली महागाई बेरोजगारी व जीवनावश्यकवस्तूंचे वाढत असलेले भाव याबद्दल लोकप्रतिनिधी काहीही बोलायला तयार नाही मग या लोकप्रतिनिधींना काय जनतेला शुभेच्छांचे व अभिनंदनाचे बैनेर व  होर्डिंग लावण्यासाठी निवडून दिले काय ? असा प्रश्न निर्माण होतं आहे.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मागील सन 2019 ची निवडणूक 200 युनिट वीज माफ करण्याच्या मुद्द्यावर लढली होती व त्यांना त्यां मुद्द्यावर जनतेने अपक्ष असतांना जवळपास 72 हजार मताधिक्यांनी निवडून पण दिले होते पण आता ते आमदार किशोर जोरगेवार काय करताहेत ? तर ते फक्त जनतेला सणासुदीचा शुभेच्छा, कुणाचे अभिनंदन व नौटंकी कार्यक्रम घेऊन जनतेच्या मूळ मुद्द्यांवर पांघरूण घालत आहे. काही लोकं फेसबुक व्हॉट्सअप वर किशोर जोरगेवार यांची खिल्ली उडवत असले तरी त्याला काहीही अर्थ नाही त्यासाठी चंद्रपूर च्या जनतेनेच त्यांच्या घरांवर मोर्चा काढून त्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्याची गरज आहे. खरं तर आमदार किशोर जोरगेवार यावी जणू तमाशाचा फळच काढला की काय ? असे जणू वाटायला लागते, कारण जेंव्हा ते प्रथम निवडून आले त्यावेळी ते सरळ तत्कालीन मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांना समर्थन द्यायला गेले होते, पण भाजप शिवसेना युती तुटली आणि महाविकास आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेत्रुत्वात सत्तेत आली तेंव्हा हेच आमदार किशोर जोरगेवार यांनी उद्धव ठाकरे यांना न मागता आपले समर्थन दिले. दरम्यान अडीच वर्षात एकनाथ शिंदे नी बंड केले आणि आपले बंडखोर आमदार गोहाटी ला नेले , त्यावेळी कुठलेही कारण नसतांना व शिवसेनचा व किशोर जोरगेवार यांचा कुठलाही संबंध नसताना पन्नास खोक्यासाठी हेच अपक्ष आमदार शिंदे ला समर्थन द्यायला गेले, म्हणजे अपक्ष असल्याचा फायदा घेत स्वतःचं भलं करणारे किशोर जोरगेवार मग जनतेला 200 युनिट वीज माफ करण्यासाठी रस्त्यांवर कां उतरले नाही ? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीची उदासीनता हिचं खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारी आहे आणि म्हणून  चंद्रपूरच्या जनतेने आता पेटून उठले पाहीजे कारण जेंव्हा वीज बिलात वाढ होण्याचा विषय सभागृहात आला तेंव्हा आमदार किशोर जोरगेवार नेमके काय करत होते ? हा प्रश्न येथील जनतेने त्यांच्यासमोर मांडला पाहीजे, जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकांनी रस्त्यांवर उतरून विरोध केला पाहीजे, पण लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांवर जर मौन राखत असेल तर त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या विरोधात लढायला हवे तरच काही निष्पन्न होईल, नाहीतर सर्वसामान्य जनतेचं आर्थिक शोषण करून हे सरकार अशाच प्रकारचे जनता विरोधी निर्णय घेऊन लोकशाही धोक्यात आणतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here