Home चंद्रपूर चंद्रपूर येथे अँटी करप्शन ब्युरोच्या उपाधीक्षक म्हणून मंजूषा भोसले रुजू.

चंद्रपूर येथे अँटी करप्शन ब्युरोच्या उपाधीक्षक म्हणून मंजूषा भोसले रुजू.

आता जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

अतिशय शिस्तप्रिय व भ्रष्ट अधिकाऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या मंजूषा भोसले यांची चंद्रपूरच्या अँटी करप्शन ब्युरो च्या उपाधीक्षक पदावर नियुक्ती झाल्याने त्यांच्या रडारवर भ्रष्ट अधिकारी येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान त्यांनी पदभार सांभाळताना जनतेला आवाहन केले की आपल्याला कुठलाही अधिकारी लाच मांगत असेल तर यांची माझ्याकडं तक्रार द्या मी त्वरित त्यांच्यावर कारवाई करतो.

जिल्ह्यात लाच – लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर च्या माध्यमातून अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाया झाल्या खऱ्या पण त्यात न्यायालयात आरोपी अधिकाऱ्यांना नेहमीच सुटका मिळाली असल्याचे बोलल्या जातेय, पण मंजुषा भोसले यांच्याकडे पदभार आल्यानंतर शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्याने जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मंजुषा भोसले यांनी या आधी गुन्हे प्रकटीकरण विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड तसेच दहशत विरोधी पथकामध्ये काम करत आपली यशस्वी कारकीर्द पार पाडलेली आहे. त्यांना आता चंद्रपूर जिल्ह्याची त्यांना जवाबदारी मिळालेली असून जिल्ह्यातील पोखरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here