Home चंद्रपूर डॉक्टर डे च्या दिवशी सेकंड इयरला शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस स्टुडंट्स ने वाचविले...

डॉक्टर डे च्या दिवशी सेकंड इयरला शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस स्टुडंट्स ने वाचविले अपघाती महिलेचा प्राण

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  काल रात्री वरोरा नाका चौकात अपघात झाला आणि या अपघातात ज्यांना मार लागला त्यांना तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेण्यास येथील माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या सोबत चंद्रपूरात गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये सेकंड इयरला शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस स्टुडंट्स ने मदत करत त्या अपघातातील महिलांचे प्राण वाचवले. काळ रात्री 10.00, वाजताच्या दरम्यान वरोरा नाका इथे अपघात झाला.तेव्हा तिथे उपस्थित 2-3 पुरूषांसोबत दोन मुलींनी जखमी महिलेला आधी डॉ. देवईकर व नंतर डॉ. बुक्कावार यांचेकडे हातावर उचलून नेण्यास मदत केली.पण तिथे त्यांना योग्य तो उपचार मिळत नसल्या मुळे त्यांना दुसऱ्या दवाखान्यात हलवावे लागले नंतर या मुली जखमी सोबत माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या गाडीत बसल्या.व जखमी महिलेला खाजगी नाही तर सरकारी दवाखान्यात नेऊ असा आग्रह त्यांनी केल्या नंतर यांच्या आग्रह बघून माजी नगरसेवक यांनी रूग्णाला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले.आणि त्यांना दवाखान्यात नेऊन त्या महिलेला योग्य उपचार सुरु होई पर्यंत या मुली यांच्या सोबत उपस्थित होते. नंतर माहिती घेतली असता या दोन्ही मुली जखमी महिलेच्या ओळखीच्या किंवा नातेवाईक नाहीत. तर चंद्रपूरच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये सेकंड इयरला शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस स्टुडंट्स आहेत डॉक्टर डे च्या दिवशी होण्याऱ्या डॉक्टर्स मुलींचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे येथील उपस्थित नागरिक व माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सांगितले.

Previous articleचंद्रपूर येथे अँटी करप्शन ब्युरोच्या उपाधीक्षक म्हणून मंजूषा भोसले रुजू.
Next articleएनसीपी में टूट! अजित पवार ने चाचा शरद से की बगावत, शिंदे सरकार में बनें डिप्टी CM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here