Home चंद्रपूर राज ठाकरे व उद्धव ठाकरे साथ देण्याचा बैठकीत सूर उमटला; शिवसेना भवनासमोर...

राज ठाकरे व उद्धव ठाकरे साथ देण्याचा बैठकीत सूर उमटला; शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मुंबई   :-  भाजपने शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडल्याने राज्यात त्सुनामी आली आहे. 24 तासांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बैठकांवर बैठक आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात मनसेही मागे नाही त्याचेही राजकीय घडामोडीकडे बारकाईने लक्ष आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत सोमवारी मनसेची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया असा सूर उमटला आहे. दरम्यान, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, असे पोस्टर शिवसेना भवन समोर लागले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मनसे कार्यकर्ता लक्ष्मण पाटील याने हे पोस्टर लावले आहे.

अजित पवार यांनी भाजपशी सोयरीक साधत उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठेच भगदाड पडले आहे. या घडामोडीत आपला पक्ष पुढे कसा न्यायचा पक्षाची भूमिका काय याबाबत आज मनसेची बैठक झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते

उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे यावर चर्चा झाली. तसंच ती कशी लढायची यावर राज ठाकरेंनी नेत्यांचं मत जाणून घेतलं

या बैठकीत उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केलं.

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला. याआधी 2017 च्या महापालिका असो किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका त्यावेळीही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी उघडपणे हात पुढे केला होता, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता. स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून राज ठाकरेंकडे विनंती केली की आता वेळ बरोबर आहे. मराठी माणासांची अस्मिता जपण्यासाठी ठाकरेंनी एकत्र यावं अशी जनभावना आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे यावर विचार करायला हवा, अशी विनंती करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत विचारलं असता आपण मेळाव्यात याबाबत भाष्य करु असं राज ठाकरे म्हणाले. त्यात सर्व काही स्पष्ट करेल असे राज ठाकरे

यांनी स्पष्ट केले आहे.

या बॅनरमध्ये राजसाहेब उद्धवसाहेब आता तरी एकत्र या असा मजकूर लिहण्यात आला होता. या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद मनसैनिकांनी घातली होती. मनसैनिकांनी लावलेल्या या पोस्टरवर, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत. यासोबत ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय, राजसाहेब उद्धवसाहेब आता तरी एकत्र या, संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असा मजकूर लिहून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचे आवाहन मनसैनिकांनी केले होते. त्यामुळे आता राजकारणात ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here