Home वरोरा गंभीर :- पारधी टोला येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढा,

गंभीर :- पारधी टोला येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढा,

चंद्रपूर जिल्हा आदिवासी हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांच्या नेत्रुत्वात महीला धडकल्या तहसिलवर………

वरोरा प्रतिनिधी –

वरोरा तालुक्यातील मौजा चिनोरा अंतर्गत येणाऱ्या पारधी टोला पिपरबोडी येथे शासनाची महसुल विभागाची भुमापण क्रमांक २, आराजी ९ हेक्टर ५४आर ही शासकीय जमीन असुन त्या जागेवर स्वातंत्र्य पुर्व काळापासून पारधी समाजाची आदिवासी वस्ती आहे, तिथे जवळपास तिनसे लोकवस्ती चे गाव आहे व शासनाने पारधी समाजाला सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे, यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, हातपंप, सौरऊर्जा पाण्याचा पंप ,नळयोजना व माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांच्या निधीतून रोडचे बांधकाम करण्यात आले आहे, तसेच हनुमान मंदिर, माता मंदिर, आहे सुद्धा आहे, यासाठी जवळपास अंदाजे दहा एकर जागा व्यापली आहे, तर उर्वरित जमीन ही पडीत होती, त्यात ग्रामपंचायत ने गुरे ढोरे चराईसाठी राखिव ठेवली होती परंतु शेजारच्या शेतकऱ्यांनी पडित शासकीय जमिनीवर अवैध अतिक्रमण करून शेती व वहिवाट करत आहेत ती त्या जागेवरील अवैध अतिक्रमण तात्काळ काढून पारधी समाजाच्या पर्यायाने ग्रामपंचायत ला स्वाधीन करा अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा चंद्रपूर जिल्हा आदिवासी हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांच्या नेत्रुत्वात महिलांनी दिला आहे.

पारधी समाजाचा परंपरागत व्यवसाय हा जंगलातून लाव्हे तितर व ससे पकडने व ते विकून आपले पोट भरणे असा होता मात्र सरकारने यावर बंदी आणल्याने त्यांना जगण्याचे साधन म्हणून येथील महिला बचत गटांना शासनाने व बॅंकेच्या माध्यमातून शेळ्या दिल्या आहेत परंतु त्यांच्या हक्काच्या शासकीय जागेवर परिसरातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने शेळ्या चराईसाठी जागा शिल्लक नसल्याने मोठी पंचाईत निर्माण झाली आहे, शेळ्या सोबतच उदरनिर्वाहाचे साधनं म्हणून पारधी समाजाच्या कुटुंबाची गुरेढोरे चरण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक राहिली नसल्याने व घराघरात शौचालय नसल्याने व शौचास जाण्यास जागा पण नसल्याने त्यांच्यावर मोठा मानसिक ताण पडला आहे, त्यामुळे काही शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण तात्काळ काढून ती जागा पारधी समाजाच्या स्वाधीन करण्यात यावी व ज्यांनी जाणीवपूर्वक अतिक्रमण करून शेतीची जागा म्हणून वापर चालवला व तिथे काहींनी बेकायदेशीर बांधकाम केले ते अतिक्रमण तोडून जागा मोकळी करावी अन्यथा पारधी समाजाच्या सगळ्या कुटुंबाना घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण व आंदोलन करण्यात येईल असा इशारा पारधी टोला पिपरबोडी चिनोरा येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा चंद्रपूर जिल्हा आदिवासी हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांच्या नेतृत्वामध्ये वरोरा तहसीलदार योगेश कौटकर यांना निवेदनातून दिला आहे, यावेळी दिले लता नंनावरे, शांताबाई शेरकुरे, शारदा नंनावरे, कांताबाई शेरकुरे, वृंदा शेरकुरे, फुलाबाई घोसरे,आशा भोसले, रत्नमाला शेरकुरे,आदि महिला उपस्थित होत्या.

Previous articleराज ठाकरे व उद्धव ठाकरे साथ देण्याचा बैठकीत सूर उमटला; शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर
Next articleअल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला तीन वर्षाचा कारावास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here