Home वरोरा गंभीर :- A.P.I. चवरेवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्या,

गंभीर :- A.P.I. चवरेवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्या,

पिडीत आदिवासी महिलेने पत्रकार परिषद घेऊन दिला पोलीस प्रशासनाला इशारा.

चंद्रपूर :-

वरोरा पोलीस स्टेशन मधे मागील चार वर्षांपासून API निलेश चवरे हे कायदा सुव्यवस्था राखण्यापेक्षा स्वतःचं कायदा सुव्यवस्था बिघडवत असल्याच्या अनेक घटना घडल्यानंतर सुद्धा व त्यांची वारंवार पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रारी असतांना सुद्धा त्यांना बळजबरीने वरोरा पोलीस स्टेशन मधे सेवेत कां ठेवल्या जातेय व त्यांच्यावर कारवाई कां होतं नाही ? हा संशोधनाचा विषय ठरत असून अवैध धंद्यांना आळा घालणारे दबंग पोलीस अधिकारी सहाय्यक अधीक्षक आयुष नोपानी सुद्धा त्यांना कां म्हणून पाठीशी घालत आहे हे कळायला मार्ग नाही. दरम्यान API चवरे यांच्या मानसिक त्रासाने कुणी आत्महत्या केल्यानंतरचं चवरे वर कारवाई करणार कां ? असा प्रश्न सुद्धा आता जनता विचारात आहे.

वरोरा तालुक्यातील खांबाडा या गावात एका आदिवासी महिलेवर अत्त्याचार करणाऱ्या इरफान शेख व इतर आरोपी विरोधात वरोरा पोलीस स्टेशन मधे दि. ३१/१०/२०२२ कलम ३७६ दिनांक २८/०१/२०२३ ला कलम ३२४, २९४, ३२४, ५०६, ३४, ३५४, अॅस्ट्रोसिटी अॅक्ट १९८९ कलम ३ (२) (va) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते, दरम्यान हा तपास API चवरे यांच्याकडे देण्यात आला मात्र नेहमीच सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून पैशाची मागणी करणारे चवरे यांनी आरोपी कडून पैसे घेऊन पिडीत महिलेवर तक्रार परत घेण्यासाठी दबाव आणल्याचे पिडीत महिलेने चंद्रपूर तेथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर सांगितल्याने या गंभीर प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ दखल घेऊन API चवरे यांना पदमुक्त करावे अशी मागणी जोर पकडू लागली आहे.

पिडीत आदिवासी महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, माझ्यावरती आरोपी शेख इरफान याने आत्याचार केला असल्याने मी त्याच्या विरोधात वरोरा पो.स्टे. येथे तक्रार नोंदवुन कार्यवाहीची मागणी केली त्यानुसार वरोरा पो.स्टे. यांनी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करूण वरोरा पो.स्टे. चे A. P.I. चवरे यांचे कडे तपास देण्यात आला होता. परंतु आरोपीचे भाऊ शेख रिजवान हा खांबाडा गावातील अवैध दारूविक्रेता असून त्याचे A.P.I. चवरे सोबत आर्थिक देवाणघेवाणचे संबंध असल्याकारणाने ३७६ प्रकरणात माझ्यावरती A.P.I. चवरे यांच्या सांगण्यावरुण आरोपी व आरोपीचा भाऊ नेहमी माझ्यावरती केस परत घेण्याबाबद दबाव टाकत आहे, त्यांच्या दबावाला मी बळी न पडता तटस्त राहिल्या करणाने ते मला वारंवार मारझोड करण्याचा व जिवे मारूण टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी मी वरोरा पो स्टे ला केल्यानंतर ही माझ्या तक्रारीची कुणीचं दखल घेत नव्हते. A.P.I. चवरे हे हेतूपरस्पर या प्रकारणात आरोपी कडून सहभाग घेऊन त्यानांच सहकार्य करीत असल्यामुळे मी A.P.I. चवरे कडे माझा तपास देऊ नये व त्यांच्या कडून तपास काढून दुसरा कुणीही तपासी अधिकारी नेमावा असे मा. पो. अधिक्षक साहेबांना विनंती अर्ज केला होता. मात्र त्यानंतर सुद्धा हा तपास A.P.I. चवरे यांच्याकडेचं असल्याने त्यांनी आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला.असा आरोप पिडीत महिलेने केला आहे.

दरम्यान आरोपीने  काही दिवसांपूर्वी महिलेच्या हातावरती चाकुसारख्या धारधार शस्त्राने वार करूण जखमी केल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले होते त्यांनंतर महिला स्वतः वरोरा पो.स्टे. येथे आरोपीच्या नावासहीत तक्रार करण्यास गेली असता वरोरा पो.स्टे. ने तक्रार नोंदवून घेत नव्हते..त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या सांगण्यावरूण ३२४ या गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर आरोपीने महिलेने तक्रार वापस घेतली पाहीजे या उद्देशाने  तिचे विरोधात गावात १० लाख रुपये मागत आहे  म्हणून खोटी बदनामी करत आहे. त्याचा जाब महिलेने  विचारला असता आरोपीचा भाऊ व त्याचे नातेवाईकानी त्यां महिलेला भर चौकात चाकुने मारहान करून त्यां महिलेचे कपडे फाडून अर्धनग्न केले व तेच आरोपी चारचाकी वाहन असल्याने पहिलेच वरोरा पो.स्टे. येथे महिले विरोधात तक्रार देत होते. दरम्यान महिला तक्रार देण्यासाठी गेली तेव्हा A.P.I. चवरे यांनी त्यांची तक्रार न घेता त्यांना धमकावीत होते व तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा हे प्रकरण मी चौकशीत ठेवतो असे म्हणून महिलेला बाहेर जाण्यास सांगीतले तेव्हा महिला त्याच अवस्थेत मा.पो. अधिक्षक साहेबाकडे जाऊन सर्व आपबीती सांगितली व त्याच्या सांगण्यावरूण सुध्दा गुन्हा दाखल करू दिला नाही त्यांनंतर मी विशेष पो. महानिरीक्षक नागपूर यांच्याकडे त्याच अवस्थेत जाऊन या प्रकारणाची तक्रार केली व त्यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला परंतु मी आदिवासी समाजाची असल्याने व आरोपी है मुस्लीम समाजाचे असताना सुद्धा अॅट्रासिटी कायदायान्वये गुन्हा दाखल केला नव्हता.

A.P.I. चवरे यांचे आरोपीशी काय आहे संबंध ?

आरोपीचा भाऊ रिजवान शेख हा खांबाडा या क्षेत्रात अवैध दारू विक्रेता असून खांबाडा हे क्षेत्र A.P.I. चवरे यांच्याकडे येत असल्याने त्यांचे आर्थिक देवान घेवाणीचे संबंध आहे. आरोपीला या केस मध्ये बाहेर काढण्याकरीता A.P.I. चवरे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. व या प्रकरणात आरोपी कडून मोठी रक्कम घेतली असल्याचा मेसेज पिडीत महिलेला आरोपींच्या पत्नीने स्वतः मेसेज केला. त्या अनुषागाने ३७६ प्रकरणात दोन महिण्याच्या कालावधीत आरोपीला अटक त्याच दिवशी दाखवून त्याच दिवशी आरोपीला जामीन मिळावा या उद्देशाने A.P.I. चवरे यांनी चार्चशीट कोर्टात पेश केली होती. त्यानंतर पिडीत महिलेला आरोपीचे भाऊ व नातेवाईकाने भरचौकात अर्धनग्न करूण मारहाण केली तेव्हा सुध्दा A. P. I. चवरे यांनी कसल्याप्रकारची चौकशी न करता तक्रार घेतली नाही. आरोपी हे पिडीत महिलेवरती जिवघेणे हमले करीत आहे पण A.P.I. चवरे यांचे आरोपीला पाठबळ असल्याकारणाने व त्यामुळे पिडीत आदिवासी महिलेच्या जिवीतास धोका निर्माण झालेला असतांना आरोपी व आरोपीचा भाऊ व नातेवाईकावर ३५४ / अॅट्रॉसिटी अॅक्ट सारखे गुन्हे दाखल असून सुध्दा वरोरा पोलीस त्यांना अटक करीत नसुन A.P.I. चवरे यांचे कड़े है प्रकरण नसुन सुध्दा ते गावात येऊन माझ्या विरोधात व आरोपीच्या बाजुने बयान देण्याकरीता गावातील लोकांना धमकावीत असून काही लोंकानी माझ्या विरोधात बयान दिले आहे.त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करूण A.P.I. चवरे वरती कार्यवाही व्हावी व माझ्या जिवीतास भविष्यात कसलाही धोका झाल्यास आरोपी व A.P.I. चवरे हेच जबाबदार राहतील व मला न्याय न मिळाल्यास व A.P.I. चवरे वरती कार्यवाही न झाल्यास आणि ३५४ / अॅट्रॉसिटी अॅक्ट चे आरोपी यांना अटक केली नाही तर मी यांच्या त्रासापाई मला पो. अधिक्षक कार्यालयासमोर आत्महत्या करण्याशिवाय मला पर्याय राहणार नाही असा इशारा पिडीत महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत दिला आहे. दरम्यान APIचवरे यांचे अनेक गंभीर प्रकरण समोर येणार असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेतली नाही तर मोठा विस्फोट होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here