Home चंद्रपूर महाराष्ट्र सौनिक सुधीर खापने यांची मनसे वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती.

महाराष्ट्र सौनिक सुधीर खापने यांची मनसे वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती.

चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यात वाहतूक सेनेच्या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करण्याचे आव्हान.

चंद्रपूर प्रतिनिधी :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर महाराष्ट्र सैनिक सुधीर खापने यांचं वास्तव्य मुंबई मधे आहे मात्र त्यांचं मूळ गाव हे वरोरा तालुक्यातील चिकनी हे असल्याने त्यांचं आपल्यां चंद्रपूर जिल्ह्यात विशेष लक्ष व प्रेम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील व्यक्ती मुंबई ला गेला की त्यांच्याकडे सुधीर खापने यांचं नेहमीच विशेष लक्ष असते. राजसाहेब ठाकरे यांना आपलं दैवत मानणारे सुधीर खापने यांची पक्षनिष्ठा व पक्ष संघटन वाढविण्यासाठीची तळमळ बघता त्यांची राज्याचे सरचिटणीस तथा वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक व वाहतूक सेना राज्य सरचिटणीस आरिफ शेख यांनी मनसे वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे यावेळी मनसे चे माजी संपर्क प्रमुख नंदू घाडीगांवकर व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असे कितीतरी पदाधिकारी आहेत ज्यांची पक्षाप्रती निष्ठा आहेत पण पक्ष संघटन वाढवण्यात ते अपयशी ठरले आहे आणि त्यामुळे पक्षाला समर्पित पदाधिकाऱ्यांची पक्षाला फ़ार गरज आहे आणि म्हणूनच सुधीर खापने सारखे मनसेचा झेंडा हाती घेऊन पक्षवाढीसाठी झटणारे पदाधिकारी पक्षाला निश्चितपणे उभारी देईल या उद्देशाने त्यांची वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असल्याची भावना वाहतूक सेनेचे राज्य सरचिटणीस आरिफ शेख यांनी व्यक्त केली. सुधीर खापने यांच्या नियुक्तीबद्दल मनसे नेते राजूभाऊ उंबरकर. राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Previous articleगंभीर :- A.P.I. चवरेवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्या,
Next articleयवतमाळमध्ये चक्क ST बस चोरीला गेली ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here