Home Breaking News यवतमाळमध्ये चक्क ST बस चोरीला गेली ?

यवतमाळमध्ये चक्क ST बस चोरीला गेली ?

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

यवतमाळ  :-  यवतमाळध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने थेट बस स्थानकातून बस चोरी केली आहे. अवघ्या काही तासांतच हा बस चोरणारा पोलिसांच्या हाती लागला. मात्र, त्याने ही बस का चोरली याचे कारण समजल्यावर पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला. यवतमाळमध्ये या बस चोरीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

का चोरली बस ?

गावी घरी जाण्यासाठी बसस्थानकावर बस उपलब्ध नसल्याने एका व्यक्तीने बसस्थानकावरून चक्क बसच पळविली आहे. यवतमाळच्या घाटंजी बसस्थानकावर हा बसचोरीचा प्रकार घडला आहे. ही बस मुक्कामासाठी आली होती. बस स्थानकावर लाऊन चालक वाहक खाली उतरले, दरम्यान भूषण लोणकर हा आरोपी त्याच्या गावी परतण्यासाठी बस शोधत होता. मात्र गावी जायला बस उपलब्ध नव्हती, त्यामुळे त्याने बसस्थानकावर उभ्या या बसला चावी लागून असल्याचे बघून, बस सुरू करून गावाच्या दिशेने दामटली. थोड्यावेळाने चालक वाहकांना बस जागेवर दिसली नसल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. बस चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली. दुसरीकडे एका पोलीस कर्मचाऱ्याला सदर विनाप्रवासी बस संशयास्पद दिसल्याने त्यांनी पाठलाग करून दुधाना जंगलाजवळ ती थांबविली असता बसचोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleमहाराष्ट्र सौनिक सुधीर खापने यांची मनसे वाहतूक सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती.
Next articleधक्कादायक :- 30 लाख रुपयांसाठी आदिवासी महिलेच्या शेतीच्या सातबारावर नाव चढवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here