Home भद्रावती धक्कादायक :- 30 लाख रुपयांसाठी आदिवासी महिलेच्या शेतीच्या सातबारावर नाव चढवले.

धक्कादायक :- 30 लाख रुपयांसाठी आदिवासी महिलेच्या शेतीच्या सातबारावर नाव चढवले.

लाख रुपयांत खपले पटवारी, मंडळ अधिकारी? भद्रावती तालुक्यातील पळसगाव सींगरु साझातील घटना.

अनुसया बापूराव मसराम यांचे बेकायदेशीर सातबारावर नाव चढवण्यात पोलीस पाटील जयंत कुळमेथेचा पुढाकार?

भद्रावती प्रतिनिधी :-

पैशांसाठी भ्रष्ट प्रशासनाचा फायदा घेऊन लोकं काय काय हेराफेरी करतील हे कळायला मार्ग नसून हजारो जमिनीची बनावट प्रकरण ह्याचं भ्रष्ट प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होतं असल्याच्या बातम्या वाचावयास मिळत असतात, अशीच एक घटना भद्रावती तालुक्यातील पळसगाव सींगरु च्या आदिवासी महिलेसोबत घडली असून त्यां महिलेच्या अशिक्षीत पणाचा फायदा घेऊन तिला मूर्ख बनविण्यात आले व तिला मिळणाऱ्या 60 लाख रुपयांच्या मोबल्यात स्वतःचा हिस्सा निर्माण करण्यासाठी अनुसया मसराम या महिलेने चक्क पटवारी व मंडळ अधिकारी यांना लाख रुपये देऊन स्वतःचे नाव चढवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता पिडीत महिलेचे जावई संजय कोयचाडे यांनी पोलीस प्रशासनासह वन विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असल्याने या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई होणार असल्याची माहिती आहे

भद्रावती तालुक्यातील पळसगाव सींगरु मधील सर्वे क्रमांक 19, 67, व 7 या शेतीच्या सातबारा मधे अनुसया मसराम यांचे नाव बेकायदेशिरपणे चढवून वन विभागाकडून मिळणाऱ्या 60 लाखांपैकी 30 लाख रुपये मिळविण्याचा खटाटोप तेंव्हा उघडकीस आला जेंव्हा त्यां जमिनीचा मोबदला चेक च्या रूपाने मिळणार होता दरम्यान पैशाची देवाणघेवाण करून अनुसया मसराम यांना 30 लाख रुपये मिळणार होते व त्यां महिलेचे जावई या पैशांसाठी वारंवार वनविभाग प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते मात्र तो सातबाराचं आता चुकीचा असल्याचे गावांतील समितीने वनविभागाला कळवले आहे त्यामुळं आता शेतीचा मोबदला तात्पुरता रोखून ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here