Home वरोरा चिंताजनक :- वर्धा पॉवर व जीएमआर कंपनीच्या फ्लाय अॅश मुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे...

चिंताजनक :- वर्धा पॉवर व जीएमआर कंपनीच्या फ्लाय अॅश मुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान.

शेतकऱ्यांना घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी गाठले तहसील कार्यालय. पांच दिवसांत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

(ता. प्र. धनराज बाटबरवे):-

तालुक्यातील टेमुर्डा परिसरातील शेतशिवारात असलेल्या एका नाल्यांच्या जागेवर कुण्यातरी कंत्राटदाराने वर्धा पॉवर किंव्हा जिएमआर पॉवर कंपनीची फ्लाय अॅश बेकायदेशीर टाकली होती दरम्यान आता आलेल्या जोरदार पावसाने ही फ्लाय अॅश या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेल्याने त्यांच्या शेतातील धान कापूस सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पांच दिवसात नुकसान भरपाई दया अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के. विशाल देठे, प्रशांत बदकी, राजेंद्र धाबेकर, प्रतीक मुडे, दिलीप उमाटे व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

तालुक्यातील शेतकऱ्यांचे अगोदरच अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असतांना आता त्यांच्या शेतात फ्लाय अॅश पसरल्या गेल्याने जमिनीच्या दर्जाचं चित्र पालटलं असून फ्लाय अॅशच्या जमिनीत फ्लाय अॅश चा थर तयार झाल्याने शेतकऱ्यांनी शेती करायची कशी ? हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळं या परिसरातील शशिकला नागभीडकर (रामजोशी ठावरी), कमलाकर पाठक, दिलीप कोटागळे, अनिल पाठक, शंकर डाहुले, जगदीश म्हरसकोल्हे, मास्तर बर्डे व फकीर कोटागळे व इतर शेतकऱ्यांना मौका चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वर्धा पॉवर व जीएमआर कंपनी विरोधात शेतकऱ्यांना घेऊन मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here