Home वरोरा भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारे त्यां मुस्लिम शब्दाबद्दल केली दिलगिरी व्यक्त.

भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारे त्यां मुस्लिम शब्दाबद्दल केली दिलगिरी व्यक्त.

बातमीतून मुस्लिम शब्दही वगळला, जातीय तेढ निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न करू नये संपादक राजु कुकडे यांचे आवाहन.

वरोरा :-

वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या घटना घडतं आहे त्यांवर भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येत असून शहरात व तालुक्यात कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावी व पोलिसांनी या बातमीचा सकारात्मक विचार करून पीडितांना न्याय द्यावा असा प्रामाणिक विचार भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. दरम्यान खांबाडा येथील महिलेवर झालेल्या अत्त्याचार प्रकरणात आरोपीच्या नावाऐवजी मुस्लिम शब्दाचा वापर दिनांक 7ऑगस्ट च्या बातमीत करण्यात आला होता मात्र ती चूक लक्षात येताच तो शब्द बातमीतून काढण्यात आला परंतु काही मुस्लिम बांधवापैकी एका बांधवांनी भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलवरील बातमीतील शब्दांवर आक्षेप घेऊन वरोरा पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल केली परंतु सदर शब्दांमुळे जातीय किंव्हा धार्मिक तेढ निर्माण होईल असा कुठलाही उद्देश संपादक यांचा नसल्याने झालेली चूक दुरुस्त करण्यात आली.अशातच मुस्लिम समाजाच्या यामुळे भावना दुखावल्या असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो व झालेल्या चुकीबद्दल समस्त मुस्लिम समाजाची माफी मागतो अशी प्रतिक्रिया संपादक राजु कुकडे यानी दिल्या आहे. दरम्यान जातीय तेढ निर्माण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये असे आवाहन सुद्धा राजु कुकडे यांनी केले आहे.

भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल च्या बातमीने हजारो अन्याय पीडितांना न्याय मिळवून दिला आहे व मुस्लिम समाजाच्या महिलांना सुद्धा न्याय मिळवून दिल्याची माहिती वरोरा तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील वाचकांना माहीत आहे त्यामुळे मुस्लिम व हिंदू याबद्दल कुठलाही वाद निर्माण करण्याचा उद्देश भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल संपादक व वार्ताहर यांचा नाही परंतु तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असेल तर आम्ही दिलगिरी व माफी मागतो असे संपादक राजु कुकडे यानी जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here