Home चंद्रपूर गणेश विसर्जन निमित्त माणूसकी ग्रुप व गणराज केटरिंग यांच्या माध्यमातून शरबत आणि...

गणेश विसर्जन निमित्त माणूसकी ग्रुप व गणराज केटरिंग यांच्या माध्यमातून शरबत आणि थंड पाणी वाटप

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दिनांक 28/9/2023 अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन निमित्त माणुसकी ग्रुप व गणराज केटरिंग चंद्रपूर यांच्याकडून सर्व गणेश मंडळांना व गणेश भक्तांना शरबत आणि थंड पानी स्टाल लावून वितरीत करण्यात आले.मिरवणुकीतील गर्दी मधे पायी फिरनाऱ्या सर्व जनतेला पाण्याची अत्यंत गरज भासत असतात यांचा विचार करून माणुसकी ग्रुप मधील सदस्यांनी भक्तांना थंड पाणी व शरबत वितरीत केले. दुपारी  04,00 वाजता पासून ते रात्री 11,00 ते 11,30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम राबवीन्यात आला.स्वतःचा फिरस्ती आनंद सोडून माणुसकी ग्रुप ची संपूर्ण टीम व मित्र परिवार तहानलेल्या जनतेला जलसेवा देत होते.यावेळी लहान मुलं, म्हातारे आजी, आजोबा, वाद्य पथक, गणेश मंडळ, सेवेत रुजू असणारे पोलीस दल, आणि बाहेर गावातून आलेल्या सर्व गणेशभक्तांना पाणी पाजून, त्यांची तहान भागवण्याचे काम या ग्रुप मेंबरनी केले. तहानलेल्या लोकांना मनसुकक्त थंड पाणी पिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व आनंद बघून माणुसकी ग्रुपच्या सदस्यांना खूप आनंद झाला. या कार्यक्रमात तात्याजी देवाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले आणि अगदी तरुण वयातील शिवम इदे, व महेश मेश्राम या मुलांनी विशेष श्रमदान केले म्हणून माणुसकी ग्रुपने यांचे आभार मानले.या ग्रुपकडून अशीच सेवा होत राहो हेच गणपती बाप्पा चरणी माणुसकी टीम ची इच्छा. या संपुर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्यास माणुसकी ग्रुपची उपस्थिती टीम विशाल रामगीरवार, विनोद पेनलिवार, सुशांत धकाते, सागर ढोरे, जास्मिन शेख, स्नेहा पुडके (ढोरे), रूपा काटकर, वंदना पुडके, महेश मेश्राम ,शिवम इदे, मुकेश पांडे, सुमित शुक्ला सदस्य उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया.

माणुसकी ग्रुपच्या संदेश

समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा (एक हाथ मदतीचा) सरबत आणि थंड पाणी वितरणाचा संपूर्ण कार्यक्रम गणराज केटरिंग चंद्रपूर व माणुसकी ग्रूप च्या माध्यमातून करण्यात आला.तरी तुमच्या मधील कोणालाही कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्य तुमच्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त किंवा कोणत्या खुशीच्या कार्यक्रमात सामाजिक पद्धतीने करण्यास इच्छुक असल्यास माणुसकी ग्रुपसी संवाद साधावा

 

Previous articleकोयला व भंगार तस्कर युनिस पर कई मामले दर्ज, तडीपार करनेकी मांग.
Next articleदसरा, दिवाळी तोंडावर असताना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here