Home वरोरा वरोरा शहरात या वर्षी कसे शांततेत पडले गणेश विसर्जन?

वरोरा शहरात या वर्षी कसे शांततेत पडले गणेश विसर्जन?

सामाजिक संघटना शिव सेवा हेल्पिंग हँड व ऑल इंडिया कौमी तन्जुम संघटना पदाधिकाऱ्यांनी स्वागत मंडपातून गणेश मंडळांचा केला सत्कार.

वरोरा प्रतिनिधी :-

काही वर्षांपूर्वी वरोरा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत शुल्लक घटनेचे रूपांतर हाणामारी व नंतर पोलिसांचा लाठीचार्ज होऊन गणेश भक्तांना पळता भुई सपाट झाली होती व कधी नव्हे तीं पोलिसांची आतंकवशाही व गुंडगिरी यामुळे गणेश भक्तांना स्वतःच्या मंडळाच्या गणपती चे विसर्जन सुद्धा करता आले नाही. दरम्यान शहरातील सामाजिक व राजकीय पुढाऱ्यांनी पोलिसांच्या या लाठीचार्ज विरोधात आंदोलन सुद्धा केले होते परंतु शेकडो गणेश भक्तांवर गुन्हे सुद्धा दाखला झाले असल्याने हा विषय मुंबई पर्यंत पोहचला होता या घटनेची दखल घेत दरवर्षी प्रमाणे पोलिसांच्या सुनियोजित सुरक्षा व्यवस्थेमुळे गणपती विसर्जन शांततेत पार पडले.

वरोरा शहरात दरवर्षी जिल्हा शांतता समिती सदस्य, माजी नगरपरिषद सभापती तथा ऑल इंडिया कौमी तऺजिम संघटना अध्यक्ष शेख जैरुदिन उर्फ छोटुभाई व त्यांचे सहकारी आसिफ भाई रजा यांच्या वतीने व  शिव सेवा हेल्पिंग हँड चे अध्यक्ष अनिल साकरीया, उपाध्यक्ष गजानन उताणे, नामवंत वकील गजानन बोढाले, अतुल जानवे अरविंद ढेंगळे, शुभम घेगाटे, योगेश गिलोरकर, अरूण मोदी दिपक घुडे, प्रशांत क्षीरसागर, महेश पवार, राहुल बोडे, कपील खेकारे यांनी गणेश मंडळाचे स्वागत व सत्कार करण्यासाठी स्वागत मंडप उभारून गणेश मंडळाचे स्वागत व सत्कार करून उत्साह वाढवला.

सार्वजनिक गणेश विसर्जन उत्सवादरम्यान वरोरा शहरात सजलेल्या या सामाजिक संघटनांच्या मंडपात गणेश मंडळ अध्यक्ष व मान्यवर व्यक्ती यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या गणेश मंडळाचे विशेष आकर्षण होते, पोलीस प्रशासन व गणेश मंडळाचे पदाधिकारी सोबतच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी समन्वय साधून हा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा शांततेत पार पाडला.

Previous articleदसरा, दिवाळी तोंडावर असताना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका
Next articleसावधान:- गरिबांच्या शिक्षणावर शिंदे फडणवीस सरकारचा फास?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here