Home महाराष्ट्र अभिनंदनीय :- आई वडिलांची छत्रछाया हरवलेल्या अनाथ मुलीचे बाप बनले मनसे नेते...

अभिनंदनीय :- आई वडिलांची छत्रछाया हरवलेल्या अनाथ मुलीचे बाप बनले मनसे नेते राजु उंबरकर

बेटा…बापासारखा आधार म्हणून मी कायम तुझ्या सोबत असेल” हे उद्गार ऐकून गावांतील महिलांच्या डोळ्यात आले पाणी.

वणी प्रतिनिधी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या सामाजिक कार्याचा आलेख बघता हा माणूस राजकारणी आहे की देवदूत अशी अनेकांना संभ्रम करणारी प्रचिती येतं असते, कारण एरव्ही राजकारणी म्हणजे निवडून येण्याचे गणितं साध्य करणारी व त्यासाठी केवळ दिखावा करून जनतेच्या असहायतेचा फायदा घेणारी मंडळी म्हणून प्रचलित असते, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर हे जरा वेगळं रसायन आहे कारण ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेच्या संकटात आणि दुःखात एकरूप होऊन त्यांना सढळ हाताने मदत करतात असाच एक अनेकांना प्रेरणा देणारा प्रसंग ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यात असावे आणणारा त्यांनी घडवला आहे. तालुक्यातील ‘बोर्डा’ येथे गावभेट दौऱ्यानिमित्त मनसे नेते राजु उंबरकर गेले असता तेथील ग्रामस्थांनी अनाथ मुलगी तेजस्विनी सतिष नक्षीने ‘ हिच्याशी त्यांची भेट घडवून दिली, दरम्यान सगळ्यां गावकऱ्यांना वाटलं की ते मुलीला काही आर्थिक मदत करतील पण उंबरकर यांनी अनाथ मुलीच्या परिस्थितीची व्यथा बघून तिला प्रेमाने जवळ बसवून “बेटा… बापासारखा आधार म्हणून मी कायम तुझ्या सोबत असेल !” असे भावोद्गार काढले आणि उपस्थित सगळ्या ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी तरळले. एका अनाथ मुलीचा आधार बनलेल्या राजु उंबरकर यांच्या या अनोख्या कार्याने सगळे गांव भारावून गेले.

‘ बोर्डा ‘ येथील अनाथ झालेल्या ‘ तेजस्विनी सतिष नक्षीने हिचे आई वडील गेल्या दीड वर्षांपूर्वी या जगातून निघून गेले. तिचा संभाळ करण्यासाठी तिचे स्वतःचे असे कोणीही नाही, बारावीचे शिक्षण सुरू आहे पण त्याचा खर्च कसा करायचा हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर असतांना आणि मनात परिश्रम करून पोलीस व्हायचे स्वप्न बाळगून ते साकार करण्याचे आव्हान असतांना यासाठी एखादा देवदूतचं तिला मदतीचा हात देऊ शकते ही परिस्थिती होती आणि शेवटी मनसे नेते राजु उंबरकर यांनी केवळ तेजस्विनीला मदतच केली नाही तर तिचं पालकत्व स्वीकारून तिला एक बाप म्हणून हक्क मिळवून दिला ही सर्वात मोठी व माणुसकीच्या दुनियेत सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवणारी घटना आहे.

मनसे नेते राजु उंबरकर यांच्यात माणूसपण आणि देवपण याचा संगम आहे हे या प्रसंगावरून समोर आले. यावेळी ते प्रतिक्रिया देतांना म्हणाले की तेजस्विनीचे स्वप्न साकार करण्यासाठी तिच्या सर्वोत्तरी खर्चाची जबाबदारी अर्थात तिला दत्तक घेण्याचे मी तात्काळ ठरवले आहे, तिचे वडील जरी जगात हयात नसतील तरी तिच्यासोबत एक बापासारखा आधार म्हणून मी कायम उभा असेल, असा विश्वास त्यांनी तिला दिला. या अनोख्या प्रसंगाने तेजस्विनी आणि उपस्थित महिलांच्या डोळ्यात आलेले अश्रू मनाला भावणारे होते. संत तुकोबाराय म्हणतात “जे जे आपणांस भेटेल ते ते स्वतःप्रमाणेच वाटावे” तशीच सर्वांचे दुःख जाणून घेऊन त्यांना आनंद देण्याची भावना कायम उराशी मी बाळगून आहे असे विचार त्यांनी प्रगट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here