Home चंद्रपूर महानगर पालिका चंद्रपूर च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धेमध्ये दत्त नगर...

महानगर पालिका चंद्रपूर च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धेमध्ये दत्त नगर मधील श्री नवयुवक बाल गणेश मंडळाचा सहभाग

 

 

 

 

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

श्री नवयुवक बाल गणेश मंडळ द्वारे किल्ला स्वच्छ्ता अभियान मध्ये सहभाग

चंद्रपूर  :-  दर वर्षी म,न,पा, च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली जाते.  यावर्षी सुद्धा महानगर पालिका चंद्रपूर च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली. त्या अनुषंगाने मागील तीन वर्षा पासून सतत श्री नवयुक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर या स्पर्धेत प्रथम क्रमांक घेत आलेला आहे.

या वर्षी सुद्धा महानगर पालिकेच्या वतीने गणेश मंडळ साठी होत असलेल्या स्पर्धेत भाग घेतला असून त्या अंतर्गत एका दिवसातील तीन तास मंडळाचा वतीने ऐतिहासिक गोंड राजाचा किल्ल्याची साफसफाई विषय आयोजन होते. त्या अनुषंगाने श्री नवयुवक बाल गणेश मंडळ यांनी इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचा मार्गदर्शन खाली बगड खिडकी किल्ल्याच्या परिसरात स्वच्छ ता अभियान मध्ये भाग घेवून हेरिटेज वॉक साठी जो रस्ता तयार करण्यात येत आहे.

तेथील परिसरातील साफ सफाई करून रस्ता तयार केला. मंडळ चा सदस्यांना या वेळी एक वेगळाच अनुभव आला असून इको प्रो च्या संस्थेचे कार्य किती कठीण आहे.याची जाणीव सुद्धा बंडू धोत्रे यांचा सोबत काम करतानी झालेल्या संवादात अनुभवात आले. या सर्व कामामध्ये गणेश मंडळ चे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहात भाग घेवून किल्ला स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे पार पाडले आहे.

Previous articleदुसऱ्यांची भूक भागविणारे शिवभोजन केंद्र संचालकच उपाशी
Next articleचंद्रपुरातील मनपा आयुक्तच्या अजब निर्णय कामगारांना न्याय देने सोडून त्याच्या कामावर उपयोजनाचे होल्डिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here