Home चंद्रपूर श्री नवयुवक बाल गणेश मंडळ व विद्यार्थी विद्यार्थिनी द्वारे पर्यावरण रॅली आणि...

श्री नवयुवक बाल गणेश मंडळ व विद्यार्थी विद्यार्थिनी द्वारे पर्यावरण रॅली आणि वृक्षा रोपण कार्यक्रम

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महानगर पालिका चंद्रपूर च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली जाते. त्या अनुषंगाने मागील तीन वर्षा पासून श्री नवयुक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर या स्पर्धेत प्रथम क्रमांक घेत आलेला आहे. या वर्षी सुद्धा महानगर पालिकेच्या वतीने गणेश मंडळ साठी होत असलेल्या स्पर्धेत भाग घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून

दत्त नगर, मध्ये स्वच्छतेचा, संदेश देत पाणी वाचवा, झाडे लावा,,झाडे जगव्हा, संदेश देत पर्यावरण संरक्षण रॅली चे आयोजन करण्यात आले. या रॅली मध्ये मोठ्या संख्येने शाळेचे विद्यार्थी व परिसरातील नागरिक सहभागी झाले. या रॅली सोबत दत्त नगर परिसरातील विविध भागात वृक्षा रोपण कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला. ज्या मध्ये देशी झाडे लावून त्याला ट्री गार्ड सुद्धा लावण्यात आले.

या झाडांमध्ये कडुलिंब, शमी, वड, पिंपळ, आवळा, कवट अशी विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सोबतच ते वाढवून मोठे करण्याचा संकल्प मंडळाचा वतीने करण्यात आला. या सर्व कार्यक्रम मध्ये शाळकरी मुले, परिसरातील नागरिक, व गणेश मंडळ चे पदाधिकारी, सदस्य, आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Previous articleलक्षवेधी :- ओबीसी आणि मराठ्यांनो भाजप तुम्हांला फसवतय.
Next articleक्राईम ब्लास्ट :- वर्ल्डकप क्रिकेट के सट्टाबाजार चंद्रपूर मे राजिक का करोडो का खेला?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here