Home चंद्रपूर दुःखद :- चंद्रपूर मनसेचा वाघ दिलीप रामेडवार काळाच्या पडद्याआड.

दुःखद :- चंद्रपूर मनसेचा वाघ दिलीप रामेडवार काळाच्या पडद्याआड.

क्रीडा विश्वातले विदर्भातील अग्रगण्य प्रशिक्षक व खेळाडू दिलीप रामेडवार यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र शोक.

उद्या सोमवार दिनांक २३ ऑक्टोंबरला सकाळी ११.०० वाजता होणार अंतिम संस्कार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात आपल्या कबड्डी सारख्या खेळात आपली छाप सोडणारे व विदर्भ कबड्डी असोसिएशन चे सचिव म्हणून यशस्वी कामगिरी करणारे मनसेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार यांचे आज दिनांक प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्रीडा विश्वातील एक पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे तर दुसरीकडे शिवसेनेत असतांना मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहताना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सन २००६ मध्ये स्थापन केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत जाणारे जिल्ह्यातील ते पहिले शिवसैनिक होते, ते तब्बल १६ वर्ष मनसे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले व त्यांना मागील वर्षी राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे मनसेचा चंद्रपूर जिल्ह्यातील एक वाघ काळाच्या पडद्याआड झाल्याने महाराष्ट्र सैनिकांनी दुःख व्यक्त केले आहे.

दिलीप रामेडवार यांना काही महिन्यांपूर्वी पॅरालिसीस (पक्षाघात) चा झटका आला होता व त्यातून ते बरे झाले होते दरम्यान काही दिवसांपूर्वी पुन्हा प्रक्रुति बिघडल्याने त्यांना मुंबई व नंतर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु औषधांना ते दाद देत नव्हते त्यामुळं त्यांना नुकतेच घरी आणण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आणि विठ्ठल मंदिरचर्चा पसरताच संपूर्ण जिल्हा आणि राज्यात बातमी पसरली. त्यांच्या पाश्च्यात्य पत्नी मुलगा व दोन मुली असा परिवार असुन परमेश्वर त्यांच्या परिवाराला या दुःखद प्रसंगी शक्ती व सामर्थ्य देवो अशी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here