40 हजार झाडे लावण्याचे कंत्राटं घेणाऱ्या त्या भाजप पदाधिकाऱ्यांनी केला भ्रष्टाचार.
चंद्रपूर :-
भ्रष्टाचार देशातून उपटून फेकण्याचा संकल्प करून देशात आणि राज्यात निर्माण झालेले भाजप सरकार आता भ्रष्टाचारी यांना कसे स्वतःसोबत घेऊन त्यांना संरक्षण देत आहे हे जवळपास सर्वानाच माहीत आहे पण आता भाजप पदाधिकारी हेच जर भ्रष्टाचार करत असेल तर मग भाजप प्रणीत सरकारकडून जनतेनी काय अपेक्षा ठेवायच्या हा प्रश्न निर्माण होत॑ आहे. असाच एक सनसनिखेज प्रकार स्थानिक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात घडला असुन विचोडा परिसरातील व्यसनमुक्तीचा नेता म्हणवून घेणारा श्रीराम एंटरप्रायजेस कंपनी चा मालक व भाजप पदाधिकारी यांनी cstps कडून घेऊन जवळपास 40 हजार झाडे लावण्याचे कंत्राटं घेतले असतांना आता त्या ठिकाणी 5 टक्के सुद्धा झाडे जिवंत नसल्याचा प्रकार समोर आल्याने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंता यासह इतर अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत॑ आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या वतीने निसर्गाचा समतोल राखला जावा व प्रदूषणाचा आघात कमी व्हावा म्हणून कचराळा येथील झुडपी जंगल परीसर क्षेत्रात नैसर्गीकपणे जंगली झाडे यासह काही झाडे वाढवून अमेझाॅन जंगलापेक्षाही जास्त घनदाट जंगल निर्माण करता यावं यासाठीच दिनांक 2 जुलै 2018 रोजी 40,000 झाडे पुरवुन त्याच्या वाहतुकीच्या आणि इतर खर्च पकडून जवळपास 53 लाख 70 हजार 877 रुपयाची किंमत मोजून हे कंत्राटं भाजप च्या एका पदाधिकारी यांना देण्यात आले. पण वास्तव असे आहे की 40 हजार झाडे नेमकी शोधावी कुठे हा प्रश्न निर्माण झाला असुन त्या ठिकाणी 5 टक्के सुद्धा झाडे उरली असतील असे निदर्शनास येतं नसल्याने ही एक प्रकारची उधळपट्टी आहे आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग व कुणाला तरी मोठं करण्याचा हा विषय असुन या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होऊन cstps च्या अधिकारी यांच्याकडून कंत्राटदारावर झालेल्या उधळपट्टीच्या हिशोब घेण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.