Home मुंबई ६ नोव्हेंबरपासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची...

६ नोव्हेंबरपासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

मुंबई  :-  ऐन दिवाळीच्या तोंडावर सोमवार ६ नोव्हेंबरपासून राज्यातील एसटी वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची शक्यता आहे. विलीनीकरण, सातवा वेतन आयोग आणि इतर काही मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. याबाबतची नोटीस एसटी महामंडळाला दिली आहे.

महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत नवीन समिती स्थापन करावी, त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात यावी, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या दोन प्रमुख मागण्या गुणरत्न सदावर्ते यांनी केल्या आहेत.

Previous articleउद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार
Next articleचड्डा ट्रांसपोर्टर यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर आयकर धाडी मागे राजकीय खेळ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here