Home चंद्रपूर चड्डा ट्रांसपोर्टर यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर आयकर धाडी मागे राजकीय खेळ?

चड्डा ट्रांसपोर्टर यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर आयकर धाडी मागे राजकीय खेळ?

भाजपच्या पक्षांतर्गत कलह व राजकीय वर्चस्वाच्या खेळात चड्डा चा बळी तर नसेल?

लक्षवेधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील ट्रांसपोर्ट क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारे व भाजप च्या एका बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यातील वेकोलि कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या, पावर प्लांट इत्यादी ठिकाणी कोळसा वाहतूक, फ्लाय ऐश वाहतूक, ओबी वाहतूक इत्यादी कामात एकछत्री राज्य निर्माण करणारे चड्डा बंधू यांनी हजारो गाड्यांची लाईन लावून इतर छोट्या ट्रांसपोर्टर ला जणू बाजूला सारले आहे. दरम्यान भाजप च्या त्या बड्या नेत्यांची चड्डा यांच्यासोबत भागीदारी असल्याची चर्चा असुन वरिष्ठ भाजप नेत्यांना यांची माहिती आहे, यात नागपूर विरुद्ध चंद्रपूर असा राजकीय अघोषित संघर्ष सुद्धा सुरू आहेत आणि त्यामुळेच या वादात आयकर धाडी तर टाकल्या गेल्या नसाव्यात अशी शंका निर्माण होत॑ आहे. दुसरं असं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दोन संभावित उमेदवारांची राजकीय इच्छाशक्ती व त्यातून वरिष्ठांना तक्रार देऊन तर ही कार्यवाही झाली असावी का ? याबाबत पण संभावना दिसतं आहे. तिसरं कारण म्हणजे एका पदाधिकारी यांची पाठराखण करणं व त्यामुळं समोरच्या नेत्यांना ते प्रकरण सहन न होणं यात पण काही अंशी वाद असल्याची माहिती आहे. एकूणच आर्थिक स्थितीने मजबूत झालेल्या नेत्यांच्या स्त्रोत असणाऱ्या संसाधनांवर गदा आणली तर शेवटी आपल्याकडं ते येईल आणि मग आपली कंडीशन सांगू हा पण यामागील प्लान असू शकतो. खरं तर ही कार्यवाही ही दिल्ली च्या इशाऱ्यावर झाली आहे कारणं दिल्लीची आयकर टीम प्रथम पोहचली, त्यामुळे छत्तीसगड मधील रायपूर या ठिकाणी सुद्धा आयकर छापे टाकण्यात आले त्या राज्यातील कोळसा घोटाळा तर झाला नसावा व त्यामुळं ही कार्यवाही निश्चितपणे कशासाठी झाली याचा सुगावा जोपर्यंत होत॑ नाही तोपर्यंत अफवांचा बाजार सुरूच राहणार आहे.

आयकर धाडी टाकून कोळसा घोटाळा व आयकर घोटाळा समोर आणायचा असेल तर ही बाब निश्चितपणे स्वागतार्ह आहे, कारणं एवढं मोठं साम्राज्य ज्या चड्डानी निर्माण केलं त्यात त्यांच्या कित्तेक गाड्या आहेत ज्यांची कागदपत्रे क्लिअर नाही, पण राजकीय वरदहस्त व आरटीओ यांना दरमहा जाणारी एन्ट्री च्या नावाने रक्कम यामुळे त्यांच्या कुठल्याही गाड्या रोड ने पकडल्या जातं नाही ही वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात चड्डा ट्रांसपोर्टर यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असतेच, कारणं कुठल्याही राजकीय कार्यक्रमात यांची देणगी असतेच त्यामुळं त्यांच्या ट्रांसपोर्ट विरोधात कुणी राजकीय पुढारी आंदोलन करत नाही. पण जिल्ह्याच्या औधोगिक क्षेत्रात एकतर्फी काम त्यांचेच असल्याने इतर ट्रांसपोर्टर दुखावल्या गेले आहे. त्यामुळे आयकर विभागाने चड्डा यांच्या चंद्रपूर, नागपूर आणि रायपूर या ठिकाणी धाडी टाकून ज्या पद्धतीने बुधवार पासून कागदपत्र व व्यवहाराची सत्यता पडताळणी सुरू केली आहे व आतापर्यंत सुद्धा तीं सुरू आहे त्यामुळं हा मोठा भ्रष्टाचार आहे व त्यात प्रामुख्यानं कोळसा घोटाळा अग्रणी असेल अशी शंका आहे.

चड्डा चे साम्राज्य किती ?

सुरुवातीला जिल्ह्यातील सिमेंट कंपन्याना कोळसा पुरवठा करणे सिमेंट बैगा ट्रांसपोर्ट करणे व फ्लाय ऐश ची ट्रांसपोर्ट करायची कामे चड्डा कंपनी करायची पण मागील सात ते आठ वर्षात यांचे भांडवलअचानक वाढून आता ही कंपनी वेकोलि कोळसा खाणी च्या ओबी व कोळसा उत्खनन करण्याचे काम सुद्धा करत आहे, त्यामुळे आता सर्वात मोठा कोळसा व्यवसाय त्यांचा झाला आहे. दरम्यान चांगल्या कोळशात माती, दगडी कोळसा व वेस्ट स्पंज आयर्न मिक्स करून तो माल वीज निर्मिती कंपन्यांना पाठवायचा व चांगला कोळसा हा खुल्या बाजारात विकायचा हा खेळ सुद्धा चड्डा यांनी सुरू केल्याने त्यांचे ब्लॅक मार्केट मध्ये सुद्धा साम्राज्य निर्माण झालं आहे. अशातच त्यांनी कोळसा खाणीतून ट्रक च्या ट्रक लंपास करण्याची अंतर्गत योजना सुद्धा आखली असल्याची चर्चा असुन त्यांनी विमला रेल्वे सायडिंग जवळ एक मोठा कोळसा डेपो तयार करून तिथे अवैध कोळसा स्टॉक करण्याचा अड्डा बनवला असल्याची चर्चा आहे. त्यामुळं चड्डा यांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांचे उद्दोगात वाढलेलं वर्चस्व व कोट्यावधी रुपयांच्या कोळशाची अफरातफर आणि त्यातून आयकर बुडविला जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या कार्यालय व निवास्थानी टाकलेल्या धाडी ह्या राजकीय नेत्यांसोबत डील झाल्याचे पुरावे जमा करण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या आहे. मात्र तरीही एका भाजप नेत्यांसोबत भागीदारी असल्याच्या कारणावरून ह्या आयकर धाडी असल्याने राजकीय वर्चस्वाच्या लढाईत चड्डा यांचा बळी जातोय असंच म्हणावं लागेल.

Previous article६ नोव्हेंबरपासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक
Next articleमाणुसकी ग्रुप चा संदेश यावेळी दिवाळी साजरी करा गोरगरिबातील नागरिकासोबत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here