Home चंद्रपूर माणुसकी ग्रुप चा संदेश यावेळी दिवाळी साजरी करा गोरगरिबातील नागरिकासोबत

माणुसकी ग्रुप चा संदेश यावेळी दिवाळी साजरी करा गोरगरिबातील नागरिकासोबत

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

एक हात मदतीचा एक छोटीशी मदत म्हणून सहकार्य करावे  मो.न :- विशाल रामगिरवार: 8055407941, जास्मिन शेख, 8421785059

चंद्रपूर  :-  सध्या चंद्रपुरात युवा पिढीतील काही युवा समोर येवून गोरगरीब, बेसहारा व मतिमंद असलेले बेसाहारा लोकांच्या मदतीस एक टीम चंद्रपुरात प्रसिद्ध होत आहे. ते टीम म्हणजे माणुसकी ग्रुप या माणुसकी ग्रुपमध्ये संपूर्ण युवा पिढीतील मुले व मुली आहे पण या माणुसकी ग्रुपच्या सदस्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे. कारण हे सदस्य जे काम करत आहे ते खूप गरजेचे आणि अत्यावश्यक आहे

आताच्या या भागदोडीच्या युगामध्ये कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही आपण आपल्या स्वतःच्याच विचार केला तर आपण आपल्या स्वतःच्या परिवाराकडे सुद्धा लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही परंतु चंद्रपुरातील या युवा सदस्यांनी स्वतःचे सर्वकाही कामधंदे करून चंद्रपुरातील बेसहारा आणि मतिमंद लोकांसाठी जे काम करत आहे ते आश्चर्यजनक आणि विचार करण्याल्याएक आहे. म्हणूनच या ग्रुपमधील सदस्यांचे जितके कौतुक करावे ते कमी आहे.

आणि आता आपला मराठी सण म्हणजे दिवाळी येत आहे. या दिवाळीमध्येही या माणुसकी ग्रुप मधील सदस्यांनी एक आगळावेगळा सण म्हणजे जे आपण फटाके मध्ये पैसे वेस्ट करत आहोत कारण काही दिवसातच दिवाळी येत आहेत आणि आपण हजारो रुपये निस्ते काही फटाक्याच्या आवाजासाठी खर्च करत असतो व तो आवाज सुद्धा काही क्षणाचा असतो आणि त्या आवाजामध्ये प्रदूषण कचरा आणि नागरिकांना व मुक्या प्राण्यांना सुद्धा त्रासदायक असतो.

म्हणून या ग्रुपच्या सदस्यांनी हे सर्व वडघडून फटाके किंवा कोणतेही इतर फालतू पैसे खर्च न करता चंद्रपुरातील गोरगरिबातील लोकांसाठी या पैशातून त्यांना चिवडा, लाडू, शंकरपाळ्या, चाकूल्या आणि मराठी दिवाळीचा सण साजरा म्हणून फुलझडी व अनार फटाक्यामधील फक्त या दोन वस्तू घेऊन माणुसकी ग्रुपमधील सदस्य गोरगरिबाच्या घरी दिवाळी साजरी करण्याचे ठरवलेले आहे.

म्हणूनच चंद्रपुरातील नागरिकांना सुद्धा या ग्रुपमधील सदस्यांनी एक छोटासा संदेश दिलेला आहे.

तो संदेश म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की फटाक्यामध्ये पैसे व्यर्थ न करता कोणाच्या गोरगरिबाच्या घरी दिवाळीच्या दिवशी थोडासा गोडधोड तुमच्या सहकार्याच्या मदतीतून जावे व या गोरगरीबाच्या घरात पण सुख समृद्धी आणि खुशिया यावि तर या ग्रुपमधील सदस्यांना संपर्क साधून त्यांना एक छोटीशी मदत म्हणून सहकार्य करावे आणि त्यांच्या या कामाला प्रोत्साहन करावे जेणेकरून माणुसकी ग्रुप मधील सदस्य यापुढे सुद्धा असेच गोरगरिबांसाठी आणि मतिमंदासाठी कार्य करत राहील.

संपर्क करण्या करिता

मो.न :- विशाल रामगिरवार: 8055407941, जास्मिन शेख, 8421785059

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here