चामोर्शी पोलिसांनी भद्रावती येथून घेतले चौकशीसाठी ताब्यात. प्रकरण गंभीर असल्याची चर्चा
भद्रावती प्रतिनिधी :-
भारतीय जनता पक्षाचे भद्रावती येथील कार्यकर्ते व स्थानिक प्रश्नांसाठी आपल्या नेत्यांना वेळोवळी अवगत करून अधिकाऱ्यांवर वर्चस्व गाजविणाऱ्या व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची जवळीक असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांना आज चामोर्शी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान चामोर्शी पोलिसांनी स्थानिक भद्रावती पोलिसांना याबाबत माहिती दिली असुन भद्रावती येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले, मात्र या घटनेचे नेमके काय कारण आहे याबाबत गोपनीयता पाळली जात असुन मोठी गंभीर बाब उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सत्ता असली की कार्यकर्ते कसे सैरावैरा होत॑ असते याचे हे उदाहरण असुन आकाश वानखेडे यांच्या वाढत्या दबंगगिरीला अनेक लोक बळी पडले असल्याची चर्चा आहे. दरम्यान एका चामोर्शी च्या युवकाने पोलिसात तक्रार दिल्याने आकाश वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे हे अजून पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले असले तरी खंडणी चे हे प्रकरण असावे असे बोलल्या जातं आहे. याबाबत चामोर्शी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी आरोपीची विचारपूस झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल किंव्हा कसे याबाबत गुप्तता पाळली आहे त्यामुळे सत्ताधारी यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने या प्रकरणाला गुंडाळले जाईल की गुन्हा दाखल होईल यात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र फिर्यादी ची बाजू उद्या समोर येणार आहे व नेमके हे काय प्रकरण आहे याबाबत फिर्यादी च्या व खबरीच्या माध्यमातून समोर येणारा असल्याने प्रकरण चिघळण्याची जास्त शक्यता आहे.