Home Breaking News राष्ट्रीय काँग्रेस नेत्या मा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर, कळमना, काटवली आदी...

राष्ट्रीय काँग्रेस नेत्या मा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर, कळमना, काटवली आदी ठिकाणी विद्यार्थांना नोटबुक वाटप

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

 

चंद्रपूर  :-  काँग्रेस नेत्या खा. मा.श्रीमंती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर, कळमना, कटवली येथील मध्ये विद्यार्थांना नोटबुक वाटप करण्यात आले.
बल्लारपूर येथील कर्मवीर कन्नमवार तेलंगू उच्च प्राथमिक शाळा नगर परिषद बल्लारपूर, सरदार पटेल हिंदी प्राथमिक शाळा नगर परिषद बल्लारपूर, येथे बुक वाटप करतांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्र ओबीसी काँग्रेस सेल अध्यक्ष विवेक जगन्नाथ खुटेमाटे यांची उपिस्थत होती.

यावेळी मुख्याध्यापिका सौ सुलोचना कडूकरसह व अन्य शिक्षकाची उपस्थिती होती. त्यानंतर  कळमना, काटवली, बामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बुक वाटप करण्यात आले यावेळी  बल्लारपूर ग्रामीणचे तालुकाध्यक्ष  गोविंदा पाटील उपरे, ओबीसी काँग्रेस सेल अध्यक्ष विवेक जगन्नाथ खुटेमाटे, काटवलीचे सरपंच राजेश ढुमणे, इटोलीचे सरपंच तुळशीराम पिपरे,

कळमनाच्या सरपंच सरलताताई परेकर, काटवलीचे उपसरपंच कवडू वाघाडे, सदस्य अरुण गडकर, नगर परिषद बल्लारपूरचे माजी नगरसेवक नरसय्या रेबावार, बामणीचे मुख्याध्यापिका  सरिता रामटेके, काटवलीचे मुख्याध्यापक विलास कुळमेथे, काळमन्याचे मुख्याध्यापक सुनील पोटे , शिक्षक विमित साखरकर,  शिक्षक धनंजय कडुरके, शिक्षिका शालीनि कोवे, तसेच  शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here